HW News Marathi
देश / विदेश

ड्रग्सच्या प्रश्नावर जया बच्चन आणि रवी किशन यांच्यात जुंपली तर कंगनाचीही या वादात उडी

नवी दिल्ली | समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत भाजप खासदार रवी किशन यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. मनोरंजन विश्वाचा भाग असलेल्या लोकसभा खासदाराने ड्रग्जच्या मुद्द्यावरुन इंडस्ट्रीविरोधात केलेले भाष्य लज्जास्पद असल्याचे त्या म्हणाल्या. विशेष म्हणजे त्यानंतर अभिनेत्री कंगना राणावतने जया बच्चन यांच्यावर पुत्र अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन-नंदा यांचे नाव घेत टीका केली आहे.

चित्रपटसृष्टीतील अंमली पदार्थांच्या वापराचा मुद्दा खासदार रवी किशन यांनी काल (१४ सप्टेंबर) लोकसभेत मांडला केला होता. त्याला राज्यसभेत उत्तर देताना जया बच्चन म्हणाल्या की ‘‘सरकारने मनोरंजन विश्वाच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे, कारण मनोरंजन विश्वच नेहमी सरकारच्या मदतीला येते. एखादी राष्ट्रीय आपत्ती आल्यास ते पुढे येतात, पैसे देतात, सेवा बजावतात. काही जणांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीची प्रतिमा मलीन करणे चुकीचे आहे” असे जया बच्चन म्हणाल्या आहेत.

दरम्यान यावर रवी किशन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जयाजींनी माझ्या बोलण्याला पाठिंबा द्यावा अशी माझी अपेक्षा होती. मनोरंजन विश्वातील प्रत्येक जण ड्रग्ज घेत नाहीत, परंतु जे घेतात ते जगातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग संपवण्याच्या योजनेचा एक भाग आहेत. जयाजी आणि मी जेव्हा इंडस्ट्रीत आलो, तेव्हा परिस्थिती अशी नव्हती. पण आता आपल्याला तिचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे” असेही ते म्हणाले आहेत.

यात अभिनेत्री कंगना राणावत हिने उडी घेत जया बच्चन यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.”जयाजी, जर माझ्या जागी तुमची मुलगी श्वेतासोबत किशोरवयात मारहाण, ड्रग्ज देणे आणि विनयभंग झाला असता तर तुम्हीही असेच म्हणाला असतात का? अभिषेकने सतत गुंडगिरी आणि छळवणूक झाल्याबद्दल तक्रार केली असती, आणि एक दिवस तो लटकलेल्या अवस्थेत आढळला असता, तर आपण असेच बोलला असता काय?” असा सवाल अभिनेत्री कंगनाने जुही सिंहचा व्हिडीओ शेअर करत विचारला आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1305742115255668736?s=19

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हॉर्न वाजवायच्या मुंबईकरांच्या हौशेला मुंबई पोलिस देणार ‘पनिशिंग सिग्नलची’ शिक्षा….काय आहे ही शिक्षा?

Arati More

दारू मिळेना म्हणून सॅनिटाईझर प्यायला आणि ..!

News Desk

महाराष्ट्रात काँग्रेसकडून बाळासाहेब ठाकरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न!; मोदींचा गंभीर आरोप

Aprna