HW News Marathi
राजकारण

अण्णांच्या गर्जनांचा पचपचीत गाजर हलवा झाला | उद्धव ठाकरे

मुंबई | ‘अण्णांच्या गर्जनांचा पचपचीत गाजर हलवा झाला याचे वाईट वाटते. नरेंद्र मोदी किंवा राजनाथ सिंह रामलीला मैदानात जातील ही अपेक्षा नव्हती, पण, केंद्रातील एखादा कॅबिनेट मंत्री जाईल व उपोषण सुटेल असे वाटले होते, पण तसे घडले नाही.

अण्णांनी पुढची तारीख देऊन उपोषण सोडले आहे. भ्रष्टचारी तसाच आहे व शेतकऱ्यांची मरणे वाढत आहेत. उपोषण सुटेल व ते सुखरुप गावी परतले यातच आम्हालाही तत्त्वत: आनंद आहे’, असे शिवसेनेच्या ‘सामना’ मुखपत्रातील संपादकीयतून अण्णा हजारे यांच्यावर टीका केली.

अण्णा हजारे दिल्लीत गेले कशासाठी व जाऊन त्यांनी मिळवले काय?, शेतकऱ्यांच्या व लोकपाल वगैर इतर प्रश्नांवर अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर उपोषण सुरू केले. विविध मागन्यांची पूर्तता करणारे पंतप्रधानांच्या सहीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांना दिले. आणि आंदोलनाची सांगता झाली.

सहा महिन्यात मागण्या मान्य नाही झाल्या तर पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले. आंदोलनातून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना काहीच हाती लागले नाही. असे सामनाच्या संपादकीयतून अनेक विविध प्रश्न उपस्थित केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

डॉ. बाबासहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने दिग्गज नेत्यांनी ट्वीट करत केले अभिवादन

News Desk

#MarathaReservation : मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची विधेयकात तरतूद

News Desk

राहुल गांधी हातात मशाल घेऊन महाराष्ट्रात दाखल; आज ‘भारत जोडो यात्रे’चा असा आहे प्रवास

Aprna
मुंबई

खासदार संजय राऊत यांच्यावर बेळगावमध्ये गुन्हा दाखल

News Desk

बेळगाव | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. निवडणुक आचारसहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा खासदार संजय राऊत यांच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. दोन भाषींकामध्ये तेढ निर्माण करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

काश्मीर, कावेरी, सतलज आणि बेळगावचा विषय लोकशाही मार्गाने सुटला नाही तर आम्ही ठोकशाहीने प्रश्न सोडवू, अशी आक्रमक भाषा राऊत यांनी शुक्रवारी केली होती.बेळगाव चा प्रश्न लोकशाहीच्या मार्गाने सुटत नसेल तर, आम्ही ठोकशाहीच्या मार्गाने हा प्रश्न सोडवू, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (29 मार्च) दिला होता. बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग आहे.

दोन्ही भागांचा इतिहास आणि संस्कृती एकसारखीच आहे. न्यायालय सीमाभागाबाबत कधी निर्णय घेईल, तो घेवो. मात्र, तोपर्यंत बेळगाव हा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा, असे राऊत यांनी म्हटले.

Related posts

रेल्वे अंगावरून जाऊनही जिवंत | सीसीटिव्हीत कैद

News Desk

मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर झाड पडले

News Desk

Dahi Handi |गोविंदा पथक करणार शहीद सैनिकांच्या कुटुंबाला मदत

News Desk