HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ खडसेजी, तुम्ही खात्री बाळगा !, अमृता फडणवीसांचे ट्विट

मुंबई । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर खडसेंनी उपस्थित केलेल्या बोचऱ्या सवलाला अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “अमृता फडणवीस यांनी एखादा व्यवहार केला तर तो पती देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का?”, असा प्रश्न खडसेंनी उपस्थित केला. यावेळी खडसेंना प्रत्युत्तर देताना “तुम्ही खात्री बाळगा एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्यामुळे मी अशी चूक करणार नाही! सर्वांचे भले होवो”, असे म्हणत अमृता फडणवीसांनी खडसेंना बोचरा टोला लगावला आहे.

एकनाथ खडसेंचे म्हणणे काय ?

“मी महसूल मंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध? माझी बायको आणि जावयाने कोणते व्यवहार करायचे नाहीत का ? समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का? किंवा त्यांनी एखादा कार्यक्रम केला, तर काय फडणवीस यांच्या आशीर्वादाने झाला, असे होते का? त्यांच्या त्या स्वतंत्र आहेत. तशी माझी बायको स्वतंत्र आहे. माझा जावई एनआरआय आहे, त्यालाही अधिकार आहेत”, असे एकनाथ खडसे म्हणाले होते.

“जर मी ती जमीन खरेदी केली असेल, तर मी त्यात दोषी आहे. माझ्याव बायकोने किंवा जावयाने व्यवहार केले असतील, तर मी दोषी कसा काय? एखाद्या उताऱ्यामध्ये इतर हक्कात कोणाचे नाव असेल, तर तो मालक लहोऊ शकत नाही. इतकी समज तरी माजी मुख्यमंत्र्यांना असायलाच हवी. त्यांना तसं वाटत असेल, तर माझी ना नाही. पण निदान मला समजवू तरी द्या”, असेही खडसे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात मध्यावधी निवडणूक होणार नाही !

News Desk

आरे मेट्रो कारशेड वाद : पर्यावरणप्रेमींचं मध्यरात्री आंदोलन

News Desk

सत्ताधाऱ्यांना राज्यातील पूरस्थितीचे गांभीर्य आहे का ?

News Desk