मुंबई | देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या १२ हजारावर पोहोचली आहे. कोरोनाचा प्रादुर्भवा रोखण्यासाठी लॉकडाऊन हा त्यावरचा उपाय नाही, असे मत माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. राहुल गांधी यांनी आज (१६ एप्रिल) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगतिले. लॉकडाउन हे पॉज बटनासारखे आहे, त्याने कोरोना थांबल्यासारेख वाटेल पण जाणार नाही, अशी भीतीही राहुल गांधींनी व्यक्त केली आहे.
Now we've reached a level, where we are in an emergency situation. India must unite&fight against it. My main suggestion is that blunt instruments must not be used. We must work strategically. Lockdown has not resolved the problem, it has only postponed the problem: Rahul Gandhi https://t.co/1Pt8uD2OQ0
— ANI (@ANI) April 16, 2020
दरम्यान, राहुल गांधी म्हणाले, सध्या देशात कोरोनामुळे आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कोरोनाविरुद्ध लढाईसाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. कोरोनाविरोधात आपण धोरणात्मक कार्य केली पाहिजेत. लॉकडाऊन हा कोरोनासारख्या समस्यावर उपाय नसून तो फक्त संसर्ग थांबवू शकतो, असे ते म्हणाले. यामुळे त्यामुळे कोरोनाला रोखायचे असेल तर कोरोना संशयितांच्या अधिकाधिक चाचण्या घेणे हाच उपाय आहे. त्यामुळे सरकारने या चाचण्या घेतल्या पाहिजेत,’ असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.