HW News Marathi
महाराष्ट्र

रिया चक्रवर्ती आणि शोविक यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला मृत्यूप्रकरणाला लागलेल्या ड्रग अँगलमुळे अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला NCB कडून अटक करण्यात आली होती. दरम्यान, त्यानंतर आता रिया चक्रवर्ती आणि शोविक या दोघांचाही जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. रिया आणि शोविकच्या जामीन अर्जावर गुरुवारी (१० सप्टेंबर) सुनावणी झाली. त्यानंतर विशेष न्यायालयाने ही सुनावणी शुक्रवारी (११ सप्टेंबर) ठेवली होती.

त्यानंतर, आज विशेष न्यायालयाने रिया आणि शोविकसह अब्दुल बसित, झैद विलात्रा, दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांचाही जामीन अर्ज फेटाळला आहे.रियाने अटकेनंतर दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केला होता. अटक झाल्यानंतर न्यायालयाने तिला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्या वेळी तिने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला.

रिया आणि शोविकच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. बी. गुरव यांनी चक्रवर्ती भावंडांची आणि पोलिसांची बाजू ऐकल्यावर सुनावणी शुक्रवारी ठेवली. या वेळी प्रकरणात अटकेत असलेल्या अन्य आरोपींच्या जामिनावरही सुनावणी झाली. या सगळ्यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने आज सुनावणी पूर्ण केली.

२८ ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकाने १० दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन जप्त केले. त्यानंतर एनसीबीकडून रियाच्या अटकेची मोठी कारवाई करण्यात आली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक आरोपी दीपेश सावंत याने दिल्याचे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील आंबिल ओढा परिसरातल्या घरांवरचा हातोडा मागे, स्थानिकांना न्यायालयाचा दिलासा

News Desk

‘संजय राव खुर्सी संभालो हवा तेज चलता है’, मनसेकडून सूचक ट्विट

News Desk

जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार!

News Desk