HW News Marathi
मुंबई

भिडे समर्थकांचा आज सन्मान मोर्चा

मुंबई | भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत संभाजी भिडे यांना क्लीन चिट दिली. त्यानंतर राज्यात विविध शहरांमध्ये संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ ‘सन्मान मोर्चा’ काढला जात आहे. मुंबईमध्ये भिडे समर्थक दाखल झाले आहेत.

पुणे, सांगली इतर शहरात भिडे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एकबोटेंना अटक झाली असली तरी संभाजी भिडेंना अद्याप अटक झालेली नाही.

संभाजी भिडेंच्या अटकेसाठी सोमवारी आंबेडकरवादी संघटनांनी मुंबईत एल्गार मोर्चा काढला होता. या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज (बुधवारी) राज्यात विविध शहरांमध्ये ‘गुरुवर्य सन्मान महामोर्चा’ काढण्यात येत आहे. दरम्यान, सांगलीसह मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, यवतमाळ, जळगाव, नाशिक, गोंदिया, महाड, सिंधुदुर्ग, बेळगाव आणि पणजीमध्ये भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ एकाच वेळी बुधवारी सकाळी १० वाजता मोर्चेला सुरूवात झाली आहे.

मुंबई आणि पुण्यातील मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मोर्चेकऱ्यांनी आपल्या हाती पोस्टर्स घेतले असले त्यावरील मजकूर आक्षेपार्ह असल्याचे दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन्नदात्याच्या मदतीला अन्नदुत धावला

News Desk

मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी

News Desk

मुंबईतील शेतकऱ्यांची यादी शासनाकडे नाही

News Desk