HW News Marathi
देश / विदेश

आण्णा हजारेंच्या आरपारच्या क्रांतीला प्रारंभ

नवी दिल्ली | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला आजपासून दिल्लीतून सुरुवात झाली आहे. अण्णा हजारे यांनी या आंदोलनाला अखेरची लढाई असे संबोधले आहे. स्वातंत्र्यांची दुसरी लढाई असे यापूर्वीच्या आंदोलनाला नाव देण्यात आले होते. त्यातून केजरीवाल व आप नावाचा पक्ष उदयास आला होता.

यावेळी आण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे फलित काय राहणार आहे, याचा सर्वांना प्रश्न पडला आहे. गेल्या तीन साडेतीनवर्षे अण्णा शांत बसून होते. त्यांनी केंद्राच्या कारभारावर वेळोवेळी टीका केली. परंतु त्याची केंद्राने दखले घेतली नाही. अखेर अण्णांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले.

शुक्रवारी सकाळी अण्णांनी रामलीला मैदानावर आपल्या आंदोलनाला सुरुवात केली. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव, जनलोकपालची अंमलबजावणी या अण्णांच्या प्रमुख मागण्या आहेत. रामलीला मैदानावर देशभरातून आंदोलक दाखल होत आहेत.

आंदोलन दडपण्यासाठी सरकारने दिल्लीकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे आंदोलकांना एकप्रकारे सरकार हिंसेसाठी प्रवृत्त करत असल्याचा गंभीर आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#AirStrike : संजय राऊत म्हणातात ‘फट गयी’ ?

News Desk

#9pm9minute : पंतप्रधानांच्या आवाहनानुसार ‘कोरोना’चा अंधकार दूर करण्यासाठी देशवासियांनी लावले दिवे

News Desk

पंतप्रधान मोदी, आम्ही इथले भाडेकरू नाही | असदुद्दीन ओवैसी

News Desk
मुंबई

राज्यात मुलाच्या तुलनेत मुलीचा जन्मदर कमी

News Desk

मुंबई | राज्यात मुलाच्या तुलनेत मुलीच्या जन्मदर कमी असून देशात महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक लागत आहे. भ्रूणहत्या याला जबाबदार असल्याचा मुद्दा दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थित केला.

त्यावर आरोग्यमंत्री दीपक केसकर म्हणाले की, २०१४ ते २०१४ मध्ये एक हजार मुलांमागे महाराष्ट्रात ९०४ इतकी मुलींची संख्या आढळून आली आहे. २०११ ते २०१७ या काळात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. ८५ सोनोग्राफी मशिन सिल केले आहे.

आतापर्यंत आठ हजार सोनोग्राफी केंद्राची तपासणी केली आहे. ५३० केसेस दाखल झाली आहे. ९६ केसमध्ये ९३ दंड झाली आहे. कालच बिडच्या एका डॉक्टराला शिक्षा झाली आहे.

Related posts

गटारीची आठवड्यापासून तयारी, मटन, चिकनवर चाहत्यांचा ताव

News Desk

विकासकांचा ३४० ते ४२० चौरस फुटांच्या घरांकडे ओढा

News Desk

ओला-उबर १७ नोव्हेंबरपासून पुन्हा संपावर

News Desk