HW News Marathi
मुंबई

विरोधी पक्षांचे सभागृहात ठिय्या आंदोलन, राज्यपालांची घेणार भेट

मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या आमदारांनी विधानसभेच्या सभागृहात ठिय्या आंदोलन केले. सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेने लोकशाहाची खून केला असून आमची सभागृहात चर्चा करायची तयारी असतांना देखील सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

विरोधी पक्षांच्या आमदारांचा २९३ चा प्रस्ताव होता. या प्रस्तावर चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसचे सूनिल केदार हे उभे राहिले होते मात्र सत्ताधारी आमदारांनी गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. विरोधकांची चर्चेची तयारी असतांना देखील कामकाज होऊ न दिल्यामुळे विरोधी आमदारांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन केले. विधानसभा अध्यक्षांच्या बाजूने विश्वास दर्शक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मांडला.

या ठरावाला शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. त्यानंतर सत्ताधारी आमदारांनीच गोंधळ घातला आणि या गोंधळात विधेयक मंजूर केले. त्यानंतर विरोधकांचा २९३ चा प्रस्ताव होता. या प्रस्तावावर चर्चा करण्याऐवजी पळ काढल्याचा आरोप करत सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरू केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्रीदेवींचे पार्थिव आज दुबईहून मुंबईत दाखल होणार

swarit

तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

News Desk

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान ‘या’ विकासकामांचे होणार लोकार्पण

Aprna