HW News Marathi
Uncategorized

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याचे निर्देश

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत येणारी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, सर्व खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि अभिनव विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.

 

सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी याबाबतचे प्रस्ताव इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्याकडे पाठवावेत, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी पत्राद्वारे सर्व महाविद्यालयांना दिल्या आहेत. कोल्हापूर, जळगाव, बारामती, यवतमाळ, अकोला, गोंदिया, चंद्रपूर, लातूर, नांदेड व अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात याव्यात त्याचप्रमाणे सर्व खासगी आणि अभिनव विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये अशा तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याबाबत चाचपणी करण्यात यावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी यांना दिल्या होत्या. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्ध्या महाराष्ट्रात पावसाची दडी, खरिप वाया जाण्याची भीती

News Desk

केळीच्या घटातून पाठवल्या जातात बनावट नोटा

News Desk

21 वर्षीय तरुणाने दिला मुलाला जन्म

News Desk