HW News Marathi
महाराष्ट्र

धक्कादायक ! पत्रकाराला कोरोनाची लागण, रुग्णालयात उपचार सुरु

मुंबई | मुंबईतील एका नामांकित वाहिनीचे सक्रीय पत्रकार यांची कोरोना टेस्ट पॉझीटिव्ह आल्याने, तसेच अनेक चॅनल्स असलेल्या एका समूहाच्या सुमारे 6 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज(१३ एप्रिल) उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना समजली. त्यांनी तात्काळ मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांचेशी संपर्क साधून या सर्व माध्यमातील लोकांची चाचणी करावी असे निर्देश दिले.

वृत्तवाहिन्यांचे सर्वच प्रतिनिधी रात्रंदिन बातम्या प्रसारणाचे काम करीत आहेत त्यांचे हे काम जोखमीचे असून त्यांनी आपले स्वास्थ सांभाळून काम करावे तसेच त्यांच्या सर्वत्र फिरण्यावर बंधने असावीत जेणेकरुन त्यांच्या आरोग्याची काळजी घेता येईल.

यासाठी शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधींशी संपर्क साधून त्यांची चाचणी करण्यासाठी देसाई यांनी महासंचालक, माहिती व जनसंपर्क यांनाही सूचना दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुढच्या ३-४ दिवसांत आकडा वेगाने वाढेल पण परिस्थिती नियंत्रणात असेल !

News Desk

सक्तीच्या वीज बिल वसुलीच्या विरोधात राजू शेट्टींचा आंदोलनाचा इशारा

News Desk

मुंबईसह राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर

swarit