HW News Marathi
देश / विदेश

दारू मिळेना म्हणून सॅनिटाईझर प्यायला आणि ..!

तमिळनाडू | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. अशातच तमिळनाडूत एका माणसाचा दारु हॅन्ड सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाला आहे. दरम्यान, त्याने हे सॅनिटायझर चुकुन नाही तर २ आठवडे दारु न मिळाल्याने प्यायले आहे.

गेले अनेक दिवस लॉकडाऊनमुळे दारुची दुकानेही बंद आहेत. कुठेच दारु न मिळाल्याने तो अस्वस्थ होता असे त्याच्या घरच्यांनीही सांगितले. त्यामूळे दारुच्या हव्यासापायी त्याने सॅनिटाझर प्यायले, त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन गेले पण डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले.

दरम्यान, या लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी दारु न मिळाल्याने आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. एकाने बिल्डिंग मधून उडी मारुन आत्महत्या केली तर लॉकडाऊन घोषित केल्यानंतर केवळ १०० तासांतच काही जणांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चीनची पुन्हा भारतात घुसखोरी

Gauri Tilekar

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय, अनेक वस्तूंवरील जीएसटीत घट

News Desk

अमेरिकेने रद्द केली भारताची विशेष व्यापारी सूट

News Desk