HW News Marathi
महाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी, अजित पवारांचे आवाहन

मुंबई | भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून कोरोनाच्या संकटामुळे महामानव डॉ. बाबासाहेबांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी, असे आवाहन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या शुभेच्छासंदेशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन त्यांना विनम्र अभिवादन केले आहे. डॉ.बाबासाहेब हे द्रष्टे विचारवंत, कृतीशील नेते होते. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रउभारणीत दिलेले योगदान अजरामर राहणार आहे. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना त्यांनी आत्मसन्मान व समानतेची संधी मिळवून दिली. ताठ मानेनं जगण्याची ताकद दिली. डॉ. बाबासाहेब हे त्यांच्या विचारांने, कार्याने महामानव ठरले आहेत. एकता, समता, बंधुतासारखे त्यांचे मानवतावादी, सुधारणावादी विचारच आपल्या सर्वांना पुढे नेतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेबांच्या उदारमतवादी विचारांचे, मानवतावादी शिकवणींचे पालन करुन देशहितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण उद्या, घरातच थांबून डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी करुया, त्यांना अभिवादन करुया. डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर व कोरोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया. असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. कोरोनाविरुद्धची लढाई आता गंभीर वळणावर आली असून ३० एप्रिलपर्यंत वाढवलेली टाळेबंदी आपल्या सर्वांचा जीव वाचवण्यासाठीच आहे. सरकारच्या या निर्णयाचा आदर राखून सर्वांनी घरातच रहा, सुरक्षित रहा असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पुरंदरेंना भेटतो ते शिवशाहीर म्हणून, ब्राह्मण म्हणून नाही” – राज ठाकरे

News Desk

कितीही प्रयत्न केले तरी मुंबईपासून बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही, सुप्रिया सुळेंचा आदित्यनाथांना इशारा

News Desk

अजित पवारांना फक्त स्वतःच्या मुलाची चिंता! स्वप्नील लोणकर आत्महत्येवरून गोपीचंद पडळकरांचा घणाघात

News Desk