HW News Marathi
महाराष्ट्र

पक्षांतराची भाकरी करपण्यास शरद पवारच जबाबदार !

मुंबई | शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये सुरु असलेल्या पक्षांतरावर भाष्य केले आहे. “राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहे. पक्षांतराची भाकरी करपण्यासाठी स्वतः शरद पवारच जबाबदार आहेत”, असा टोला विनायक मेटे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. त्याचप्रमाणे, “या वयात त्यांना होत असलेल्या या त्रासामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कोणत्याही पक्षातील नेत्याला दुःखच होईल”, असेही विनायक मेटे यावेळी म्हणाले.

विनायक मेटे हे आधी राष्ट्रवादीचे आमदार होते. सध्या ते भाजप-शिवसेना युतीसोबत आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसंग्रामने १२ जागांची मागणी केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, नवी मुंबईचे संदीप नाईक, माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्र वाघ, वैभव पिचड, साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले आणि काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांनी नुकताच आपल्या पक्षाला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाण्याच्या महापौरांची व्हॉटसॲपवरुन ऑक्सीजनची मागणी, मुख्यमंत्र्यानी तात्काळ केली व्यवस्था⁩

News Desk

२१ ऑगस्टपासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

Gauri Tilekar

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्याबाहेर शेतकऱ्यांनी केली गर्दी

News Desk