HW News Marathi
देश / विदेश

राज बब्बर यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

नवी दिल्ली | राज बब्बर यांनी उत्तर प्रदेशातील प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. फुलपूर आणि गोरखपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या युतीने दोन्ही जागांवर विजय मिळाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे बब्बर यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

राज बब्बर यांच्या जागी काँग्रेसच्या युवा उमेदवारांना संधी मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. बब्बर यांच्या आधी गुजरातचे भरतसिंह सोलंकी आणि गोव्याचे शांताराम नाईक या दोघांनी सुद्धा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या काँग्रेसमध्ये नवीन बदलाचे वारे वाहू लागेल आहेत. हे बदल काँग्रेससाठी कितपत फायदेशीर ठरतील हे येणारा काळच सांगेल.

राज बब्बर हे हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता आहेत. त्यांनी हिंदीबरोबरच पंजाबी सिनेमात देखील काम केले आहे. त्यांनी तीन वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडणूक निवडून आले आहेत. सध्या ते दुसऱ्यांदा राजसभेवर गेले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रशिया-युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थांना मायभूमीत आणण्यासाठी जयंत पाटलांची पंतप्रधानांकडे मागणी

Aprna

मॅगी पुन्हा संकटात

News Desk

नीरव मोदीला लवकरच होणार अटक, लंडन न्यायालयाचे आदेश

News Desk