HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास तयार !

मुंबई | आपण युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास तयार असल्याचे अत्यंत मोठे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच, “आपल्याला आदित्य यांना सरकारचा भाग म्हणून पाहायला आवडेल”, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपमुख्यमंत्रीबाबत हे वक्तव्य केले आहे. दरम्यान, आता विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तशी शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून चढाओढ पाहायला मिळत आहे.

“आदित्य ठाकरे यांना राज्याचे उपमुख्यमंत्रिपद देण्यात आम्हाला कोणतीही अडचण नाही. आम्ही आताही त्यांना हे पद देऊ शकतो. आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे पहिले सदस्य ठरतील. आम्हाला त्यांना सरकारचा भाग म्हणून पाहायलाही आवडेल”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, एकीकडे शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पुढे केले जात असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“या PI लगडचा बाप कोण आहे, ते आम्ही शोधून काढू”, चित्रा वाघ कडाडल्या 

News Desk

फडणवीस साहेब जमल तर बघा ! नाही तर सोडून द्या 

News Desk

परळीतील हातावर पोट असलेल्या गोरगरिबांना ‘नाथ प्रतिष्ठान’चा मदतीचा हात

swarit