HW News Marathi
महाराष्ट्र

ज्यांनी कधीही निवडणूक लढवलेली नाही त्यांनी ईव्हीएमवर बोलूच नये !

मुंबई | “ईव्हीएमविरोधात राज्यातील विरोधीपक्षांनी घेतलेली पत्रकार परिषद पाहिली. याबाबत माझी प्राथमिक प्रतिक्रियाच हि आहे की, अशी पत्रकार परिषद घेण्याआधी जे या ईव्हीएमद्वारेच निवडून आलेले आहेत त्या बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आणि अजित पवार यांनी राजीनामे द्यावेत”, अशी आशिष शेलार म्हणाले. त्याचप्रमाणे, “या पत्रकार परिषदेत इतर जे कोणी होते ज्यांनी कधीही निवडणूक लढवलेली नाही त्यांनी तर ईव्हीएमवर बोलूच नये”, असे म्हणत शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

“लोक आता विरोधकांना स्विकारायला तयार नाहीत. त्यांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे, अशी झाली आहे. म्हणूनच, ते ईव्हीएमवर टीका करीत आहेत. त्यांनी आधी आत्मपरिक्षण करावे. भारतीय निवडणूक आयोगाचे जगभरातून कौतुक होत असताना विरोधी पक्ष त्यांच्यावर त्यावरअविश्वास निर्माण करीत आहेत,” असेही आशिष शेलार यावेळी म्हणाले. राज्यातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची ईव्हीएमविरोधात आज (८ ऑगस्ट) मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद झाली. दरम्यान, ईव्हीएमविरोधात सर्व विरोधक २१ ऑगस्टला मोर्चा काढणार आहेत.

“देशात ईव्हीएमबाबत संशय निर्माण व्हावा असे वातावरण आहे. निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षाकडून जागांचे आकडे सांगितले जात आहेत. इतका विश्वास आला कुठून ? त्यामुळे ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्याला वाव मिळत आहे. म्हणूनच आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी आम्ही करत आहोत”, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. “आगामी निवडणूक बॅलेटपेपर घेण्यात याव्यात यासाठी आम्ही राज्यभरातील जनतेकडून एक फॉर्म भरुन घेणार आहोत”, अशी माहिती देखील राज ठाकरे यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी परीक्षेचा निकाल जाहीर, ७४२ महिला उत्तीर्ण

News Desk

मी सर्वात जास्त जमीन खरेदी केली ही केवळ अफवा | राजू शेट्टी

News Desk

शरद पवारांच्या आवाहनाला एसटी संघटनांचा सकारात्मक प्रतिसाद

News Desk