HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आजपासून बारामती पॅटर्न सुरू

बारामती | कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी बारामती पॅटर्नचा अवलंब आजपासून (१२ एप्रिल) केला जाणार आहे. नगरपरिषदेच्या परिसरातील ४४ वार्डामधील, ४४ नगरसेवक, ४४ झोनल ऑफिसर, व ४४ पोलीस कर्मचारी मिळून प्रत्येक वार्डातील दहा ते वीस स्वयंसेवकांच्या माध्यमातून नागरीकांना अत्यावश्यक घरपोच सुविधा पोहचविण्यात येणार आहेत. त्यामुळे कुठल्याही नागरीकांना आता घरा बाहेर पडता येणार नाही.किंवा कुठल्याही नागरीकांना बारामती शहरात येता येणार नाही, अशी माहिती बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली आहे.

बारामती शहरातील एका स्वयंसेवकास लाॅकडाऊन च्या कालावधीत ३५ ते ४० कुटुंबाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे , हे स्वयंसेवक प्रत्येकाच्या घरी जाणार असुन, त्या नागरिकांना स्वयंसेवकाचा मोबाईल नंबर दिला जाणार आहे.ज्या कुटुंबियांना अत्यावश्यक बाबीची गरज भासेल,त्यां नागरीकांनी त्यांना कॉल केल्यावर अत्यावश्यक सेवा करिता लागणारा खर्च (त्या वस्तू खरेदीकरिता येणारा खर्च) त्या कुटुंबातील व्यक्तीकडून घेतला जाणार आहे व नागरीकांना घरपोच वस्तु,भाजीपाला, औषधेे आदी. देण्यात येणार. यामुळे कोरोणाचा व्हायरस संसर्ग मुळापासून नष्ट करता येईल. नागरीकांना घरी बसून सर्व सेवा मिळतील. पोलिसांना शहरात गस्ती करीता, तात्काळ संपर्काकरिता वाकी-टॉकी देण्यात आली आहे. त्यामुळे तात्काळ पोलिस घटनास्थळी पोहोचणार आहेत. लाॅकडाऊन च्या कालावधीत आता नागरिकांनी कोणतीही सबब न सांगता घरातच बसावे व प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाईट नेता मिळणे हा महाराष्ट्राचा दोष नाही !

News Desk

“अजित पवारांना शोधा, तुमच्या घरात शिरुन तुम्हाला ठोकलाय”

News Desk

यंदाच्या विधानसभेत पंकजा मुंडे अन् धनंजय मुंडे आमने-सामने

News Desk