HW News Marathi
मुंबई

ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने ‘रोजगारमुक्त’ केले, त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ची मुक्ताफळे उधळली

मुंबई | ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने ‘रोजगारमुक्त’ केले, त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ची मुक्ताफळे उधळली आहेत, अशा शब्दात मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या रविवारच्या टिकेला प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे यांनी वक्तव्य करताना आपला उंची पाहून बोलावे, असाही टोला शेलार यांनी लगावला आहे.

विधानसभा ‘मनसेमुक्त’ झाली, मुंबई महापालिकेतील उरले-सुरलेले नगरसेवकही पळून गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही. यापूर्वी राज ठाकरेंच्या भाषणांवर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव दिसायचा, हल्ली शरद पवार यांचा प्रभाव दिसून येतो, असाही टोला लगावला. “मोदीमुक्त भारत करण्याआधी महाराष्ट्रानेच त्यांना मनसेमुक्त केलेला आहे. पराभूत मानसिकतेतून केलेली ही केविलवाणी धडपड आहे. ‘मोदीमुक्त भारत’ करण्यासाठी यांच्याकडे नेते कोण आहेत? यांचे नेते गल्लीपुरते मर्यादित आहेत.”, अशी टीका आमदार अतुल भातखळकरांनी राज ठाकरेंवर केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उद्धव ठाकरें कोण म्हणाल उद्धट ?

News Desk

विद्यार्थ्यांनी सीएसएमटी येथे अनोख्या पद्धतीने साजरा केला स्वातंत्र्य दिन

News Desk

कृषिपंपांच्या वीज जोडण्यांसाठी सौर कृषिवाहिनी, एचव्हीडीएस योजनेच्या कामांना आणखी वेग द्या

News Desk
महाराष्ट्र

आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा मूक मोर्चा

Gauri Tilekar

पुणे | पुण्यातील मुस्लिम समाजाकडून रोजगार आणि शैक्षणिक क्षेत्रातील मुस्लिम समाजाला दिले गेलेले ५ टक्के आरक्षण कायम करावे या मुख्य मागणीसाठी गोळीबार मैदान ते विधानभवनापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे या मूक मोर्चात नियोजनासाठी सुमारे तीन हजार स्वयंसेवक तैनात आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा मुस्लिम समाजाकडून हा मोर्चा काढण्यात आला आहे.

 

मुस्लिम समाजाव्यतिरिक्त इतर अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्तेदेखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण कायम करावे त्याचप्रमाणे गोरक्षा, लव्ह जिहाद यासारख्या मुद्द्यांमुळे केवळ संशयावरून विनाकारण अनेक मुस्लिमांची मॉब लिंचिंगद्वारे झालेल्या हत्या या विरोधातही या मूक मोर्चात अनेक फलक दिसत आहेत. दलित व मुस्लिमांवरील जातीय, धार्मिक अत्याचाराच्या घटना रोखण्यात याव्यात तसेच मुस्लिम समाजाला अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण मिळावे या मागण्यादेखील या मोर्चामार्फत केल्या जात आहेत.

 

 

 

 

Related posts

‘परमबीर सिंह यांची हायकोर्टात याचिका’, चांदिवाल आयोगाची गरच काय!

News Desk

राज्यात दिवसभरात ८ हजार १९६ रुग्ण कोरोनामुक्त १५८ रूग्णांचा मृत्यू!

News Desk

भोकर, बेंबर संयुक्त वन व्यवस्थापन समितीला ” संत तुकाराम वन ग्राम पुरस्कार “

News Desk