HW News Marathi
महाराष्ट्र

उल्हासनगरात मुस्लिम समाजाचं कब्रस्तानासाठी उपोषण

उल्हासनगर (गौतम वाघ)-उल्हासनगरात मुस्लीम समाजाने दफनभूमीसाठी उपोषण केलं. मागील ४० वर्षांपासून मृतांना दफन करण्यासाठी एकही जागा पालिकेनं दिलेली नाही. त्यामुळं मुस्लीम समाजाला मोठं मनस्ताप सहन करावा लागतोय.

सिंधीबहुल उल्हासनगर शहरात जवळपास एक ते दीड लाख मुस्लीम समाजव वास्तव्यास आहे. मात्र समजत कुणाचा मृत्यू झाला, तर त्यांना कल्याण किंवा अंबरनाथच्या कब्रस्तानात नेऊन दफन करावं लागतं. त्यामुळं आधीच दु:खात असताना मृताच्या नातेवाईकांना आणखी मनस्ताप सहन करावा लागतो. पालिकेनं काही वर्षांपूर्वी म्हारळ गावालगतची एक जागा कब्रस्तानासाठी दिली होती, मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे या जागेला दोन अंत्यसंस्कार झाल्यानंतर टाळ ठोकण्यात आलंय. त्यामुळं मुस्लीम समाजात रोषाचं वातावरण आहे. मुस्लीम समाजाला हक्काची कब्रस्तानाची जागा मिळण्यासाठी आज मुस्लीम समाज आणि भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं उल्हासनगर महापालिकेसमोर एकदिवसीय उपोषण करण्यात आलं. मात्र यावेळी पालिकेच्या वतीनं त्यांना कुठलंही आश्वासन देण्यात आलेलं नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचे हे सूर्ययान मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर सुरक्षित उतरेल !

News Desk

शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांचा पलटवार!

News Desk

राज्यात म्युकरमायकोसिसच्या उपचारांचे दर निश्चित, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!

News Desk