HW News Marathi
महाराष्ट्र

आता धनगर समाजाला देखील लागू होणार अनुसूचित जमातीच्या २२ योजना

मुंबई | राज्य मंत्रिमंडळाने धनगर समाजाकरिता एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने अनुसूचित जमातीच्या (ST) २२ योजना धनगर समाजाला देखील लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या २२ योजनांमध्ये आदिवासी विकास विभागाच्या १३ आणि उर्वरित ९ अन्य विभागाच्या योजनांचा समावेश आहे.

धनगर समाजाला लागू होणाऱ्या ‘भटक्या जमाती-क’ प्रवर्गातील योजना

1.भूमीहिन मेंढपाळ कुटुंबांसाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त, मेंढीपालनासाठी जागा उपलब्ध करुन देणे किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तत्त्वावर अर्थसहाय्य देणे

2. वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वित करणे

3.गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश देणे

4. ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना पहिल्या टप्प्यात 10 हजार घरकुले बांधून देणे

5. आवश्यक असलेल्या परंतु अर्थसंकल्पित निधी उपलब्ध नसलेल्या योजना/कार्यक्रम राबवण्यासाठी न्युक्लिअस बजेट योजना.

6. राज्यातील भटक्या जमाती-क या प्रवर्गातील व्यक्त सदस्य असलेल्या सहकारी सूत गिरण्यांना भागभांडवल मंजूर करणे.

7. केंद्र सरकारच्या ‘स्टॅण्ड अप इंडिया’ योजनेत या प्रवर्गातील नवउद्योजकांना सहाय्य करण्यासाठी मार्जिन मनी उपलब्ध करुन देणे.

8.मेंढपाळ कुटुंबांना (प्रायोगिक तत्त्वावर) पावसाळ्यात चराईकरिता जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांसाठी चराई अनुदान देणे.

9. होतकरु, बेरोजगार, पदवीधर युवक आणि युवतींना स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षापूर्व निवासी प्रशिक्षण देणे.

10. बेरोजगार युवक आणि युवतींनी स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षा शुल्कात आर्थिक सवलती लागू करणे.

11. बेरोजगार युवक आणि युवतींना लष्करातील सैनिक भरती आणि राज्यातील पोलिस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षण देणे.

12. ग्रामीण परिसरातील कुक्कुटपालन संकल्पनेअंतर्गत ७५ टक्के अनुदानावर ४ आठवडे वयाच्या सुधारित देशी (सीएआरआय-मान्यता प्राप्त) प्रजातीच्या १०० कुक्कुट पक्ष्यांच्या आणि संगोपनासाठी अर्थसहाय्य.

13. नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आणि अमरावती या महसुली विभागांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करणे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपाची मुबई महापालिकेसाठी 195 जागांची यादी जाहीर

News Desk

“काय रे, अलिबागवरून आलायस का?”, असे कोणालाही विचारू नका

News Desk

मातोश्रीमध्ये भुताटकी तिथे शांतीतज्ञ करा, नारायण राणेंचा खोचक सल्ला

News Desk