HW News Marathi
महाराष्ट्र

धारावीतील ५ कोरोनाबाधितांपैकी २ जण तब्लिगी जमातीचे कार्यकर्ते, दादरमध्ये ३ पॉझिटिव्ह

मुंबई | मुंबईत सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट तयार होताना दिसत आहेत. त्यातील महत्त्वाचा हॉटस्पॉट म्हणजे धारावी. धारावीत आज (१० एप्रिल) ५ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील २ जण मरकजच्या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यामुळे धारावीतील संपूर्ण परिसर पोलीसांनी सील केला आहे. धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या २२ वर गेली आहे. तसेच, दादरमध्ये काही दिवसांपूर्वी १ कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यात आता आणखी ३ जणांची भर पडली आहे. यात दादरच्या सुश्रृषा रुग्णालयातील २ नर्सेसचा समावेश आहे. त्यामूळे हे रुग्णालय सील करण्यात आले आहे.

तसेच, धारावीत सापडलेल्या ५ जणांपैकी वॉकहार्टमधील डॉक्टरच्या पत्नीचा समावेश आहे. त्यामूळे धारावीत ते ज्या भागात राहतात तो परिसर सील करण्यात आला आहे. तर दुसरा रुग्ण धारावीतील मुस्लिम नगर येथील आहे. कल्याणवाडी, मुरगन चाळ आणि पीएमजीपी कॉलनीत प्रत्येकी ३ रुग्ण आहेत आणि हा परिसर सील करण्यात आला आहे. २ जण हे तब्लिगी जमातीचे कार्यकर्ते आहेत आणि मरकजच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी उत्तर द्यावं – किरीट सोमय्या 

News Desk

“बाळासाहेबांशी बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही”, विनायक राऊतांची संतप्त भावना

News Desk

राज्यात 23 मराठा संघटना काम करतात, मग भूमिका वेगळी का? विखे-पाटलांचं संभाजीराजेंना प्रश्न

News Desk