HW News Marathi
मुंबई

छगन भुजबळ यांना केईएम हॉस्पिटल मध्ये हलवणार

मुंबई | राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्याची ऑर्थर रोड जेल प्रशासनाने मान्यता दिली आहे. पचनसंस्था बिघडल्याने भुजबळावर उपचार करण्याची गरज असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे.

दरम्यान, भुजबळांना काही झाले तर तुम्ही जबाबदार असाल असे शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं होतं. इतकंच नाही, भुजबळांना काही झालं तर त्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल, असंही म्हटलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

छगन भुजबळांच्या प्रकृतीची विधानपरिषद सभागृहात चिंता योग्य उपचार करण्याची धनंजय मुंडे यांची मागणी

News Desk

#CoronaVirus | वरळी कोळीवाड्यात कोरोनाचा पहिला बळी

News Desk

मोबाइल सावरताना आईने चिमुरडीला दहाव्या मजल्यावरून पाडले

News Desk
देश / विदेश

नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात CRPF चे आठ जवान शहीद

News Desk

सुकमा | नक्षलवाद्यांनी घडविलेल्या शक्तिशाली स्फोटात ९ सीआरपीएफ जवान शहीद झाले आहेत. सुकमा जिल्ह्याच्या किस्ताराम भागात नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडविला. या स्फोटात दोन जवान जखमी झाले आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २१२ व्या बटालियनवर हा हल्ला करण्यात आला.

जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या मदतीने रायपूर येथे वैद्यकीय उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांमध्ये एएसआय आर. के. एस. तोमर, मुख्य हवालदार लक्ष्मण आणि हवालदार अजय यादव, मनोरंजन लंका, जितेंद्र सिंह, शोभित शर्मा,मनोज सिंह, धर्मेंद्र सिंह, चंद्रा एच. एस. यांचा समावेश आहे.

Related posts

कथुआ बलात्कार प्रकरणाची सुनावणी पठाणकोट कोर्टाकडे

News Desk

आज पुन्हा पेट्रोल १५ तर डिझेल १६ पैशांनी स्वस्त

Gauri Tilekar

वर्षा अखेरीस पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी स्वस्त

News Desk