HW News Marathi
महाराष्ट्र

‘मी’च वरळीचा आमदार असणार !

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज (२५ जुलै) शिवसेनेत प्रवेश केला आहे. यानंतर वरळीचे शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनील शिंदे प्रतिक्रिया देताना म्हटले की, “येत्या काळात देखील मीच वरळीचा आमदार असणार, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.” २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार सचिन अहिर यांचा पराभव केला होता. यामुळे या दोघांमध्ये वैर असल्याचे स्पष्ट चित्र झाले आहे.

सचिन अहिर यांच्या पक्ष प्रवेशा वेळी सुनील शिंदे देखील उपस्थित होते. यावेळी सुनील शिंदे म्हणाले की, “सचिन अहिर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत मला काहीच माहित नव्हते. मात्र आज सकाळी पक्ष श्रेष्ठींनी मला बोलावून घेतले. त्यामुळे सचिन अहिर यांनी जरी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी वरळीचा आमदार मीचे असणार आहे.”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जनाशीर्वाद यात्रा म्हणजे तिसऱ्या लाटेला आमंत्रण!

News Desk

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची लगेच व्यवस्था होते

News Desk

डेल्टाचे नवी मुंबईत 2 तर उरणमध्ये एक रुग्ण आढळला!

News Desk