HW News Marathi
महाराष्ट्र

नालासोपाऱ्यातील ९ महिन्याच्या गर्भवती महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

नालासोपारा | कोरोनाचा वाढता विळखा आणखीच घट्ट होत चालला आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यातूनच नालासोपारा येथील एका गर्भवती महिलेचा कोरानामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच तिला नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ही महिला ९ महिन्यांची गरोदर होती. गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे.

मुंबईत कोरोनाचा आकडा हा ४०० च्या पुढे गेला आहे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. मुंबई हे कोरोनाचे केंद्र बनत चालले आहे. तसेच, पुण्यातही कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत चालली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील काही परिसर पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय पालिका आणि प्रशासन घेत आहेत.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शिवप्रसाद’ दिला आहे, ‘शिवभोजन’ थाळी देण्याची वेळ आणू नका, ‘त्या’ राड्यावरुन संजय राऊतांचा भाजपला इशारा

News Desk

महाविकासआघाडीतील पक्षांनी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे !

News Desk

#Coronavirus : मध्यरात्रीपासून देशांतर्गत सीमा बंद, सर्वांनी समजूतदारपणा दाखवणे गरजेचे !

swarit