HW News Marathi
देश / विदेश

ब्रिटनच्या गृहमंत्री पदी भारतीय वंशाच्या प्रीती पटेल

लंडन | बोरिस जॉन्सन हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाले असून बोरिस यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी भारतीय वंशाची महिला खासदार प्रीती पटेल यांचा समावेश केला आहे. प्रीती पटेल यांना गृहमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रीती या कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या (हुजूर पक्ष) बॅक बोरिस अभियानाच्या प्रमुख सदस्य होत्या. यामुळे प्रीती यांनी मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच ब्रिटनमध्ये त्यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रशंसक म्हणून ओळखले जाते.

प्रीती पटेल मूळ गुजरातच्या असून आफ्रिका खंडातील युगांडा येथे वास्तव्यास असलेले त्यांचे आई-वडील ६० च्या दशकात इंग्लंडमध्ये गेले होते. प्रीती या ४७ वर्षीय असून २०१०मध्ये विटहॅम मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. तसेच प्रीती यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला होता. याआधी प्रीती पटेल यांनी डेव्हिड कॅमेरून यांच्या सरकारमध्ये रोजगार राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानला झटका, कुलभूषण जाधव खटल्याला स्थगिती नाही

News Desk

“आम्ही नागालँडच्या मुख्यमंत्र्यांबरोबर, पण…”; शरद पवारांनी भूमिका घेत म्हणाले

Aprna

मराठा आरक्षणासाठी एकजुटीने लढा देऊ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna