HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान ‘मातोश्री’च्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच असलेल्या चहावाल्याला कोरोनाची लागण

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीच्या जळपासचा सर्व परिसर सील करण्यात आले. हा संपूर्ण परिसर आज (६ एप्रिल) बीएमसीने तातडीने सील करण्यात आला आहे. बांद्याच्या प्रसिद्ध कलानगरमध्ये मुख्यमंत्र्यांचे निवस्थान आहे. मातोश्रीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून जवळच असलेल्या चहा विक्रेत्याची प्रकृतीची बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करणयात आले. या चहा विक्रेत्यांची तपासणी केल्यानंतर कळाले की, चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पीटीआयने वृत्त दिले आहे.

सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहाता मुख्यमंत्र्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या ड्रायव्हरला सुट्ट दिली होती. ते स्वत:च कार चालवत बैठकांना उपस्थित राहत आहेत. मुख्यमंत्र्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून भेटी गाठीही बंद केल्या आहेत. मुख्यमंत्री राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधतात. कलानगर हा ‘एच पूर्व’ विभागामध्ये मोडतो. ५ एप्रिलपर्यंत सापडलेल्या रुग्णांच्या आकड्यावरुन हा विभाग गंभीर प्रकारात मोडतो. इथे आतापर्यंत २५ कोरोनाग्रस्त आढळले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्त्रीशक्तीचा आदर करूया, बरोबरीचे स्थान देऊया! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

लम्पी चर्म रोग बाधित पशुधनाच्या औषधांचा सर्व खर्च शासन करणार! –  राधाकृष्ण विखे पाटील

Aprna

भोकर : कॉग्रेसच्या बालेकिल्यात भाजपाने लावले सुरुंग

News Desk