HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनामूळे सगळ्यात जास्त वयोवृद्ध दगावले

मुंबई | कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा हा ७८१ झाला असून ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक समावेश आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ६० वर्षांवरील २० ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर ३० ते ५० वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची सर्वाधिक लागण झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

कोणत्या वयोगटातील कोणाला कोरोनाची लागण झाली पाहूयात…

  • ३१-४० वयोगटातील १२८ जणांना लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे.
  • ४१-५० वयोगटातील १३३ जणांना लागण झाली असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • ५१-६० वयोगटातील ८८ जणांना बाधा झाली असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • ६१-७० वयोगटातील ७३ जणांना लागम झाली असून १४ जणांना मृत्यू झाल आहे.
  • ७१-८० वयोगटातील ७३ जमांना लाघण झाली असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • ८१-९० वयोगटातील ९ जणांना लागण झाली असून २ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची ही यादी आरोग्य विभागाकडून देण्यात आली होती. कोरोना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेना युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या चाचणी केंद्रात आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या १६००८ नमुन्यांपैकी १४८३७ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर ७४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. सध्या राज्यात ४६,५८६ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३१२२ जण संस्थात्मक क्वॉरंटाइनमध्ये आहेत.ॉत २१ दिवसांचा लॉकडाायरसच्या वाझरंतू पकाय म्हसुपूर्दhi, harvu shkt nhi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया! – मुख्यमंत्री

Aprna

त्रिपुरा हिंसाचारांचं अमरावतीत तीव्र पडसाद; बंदला हिंसक वळण, तणावाचं वातावरण

News Desk

विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

News Desk