HW News Marathi
महाराष्ट्र

#COVID19 : ३३ नव्या रुग्णांची भर, राज्यात कोरोना बाधितांची संख्या ७८१ वर

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वेगाने होताना दिसत आहे.राज्यात आज (६ एप्रिल) कोरोना बाधितांची संख्या ७८१ वर पोहोचली आहे. गेल्या १२ तासात कोरोनाचे ३३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई ११, पुणे १९ , सातारा १, वसई १, असे मिळून ३३ रुग्णांची वाढ झाली आहे. तर आतापर्यंत कोरोना ५६ जण कोरोना मुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच राज्यात ४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, देशात कोरोना बाधितांचा आकडा ४००० पार गेला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर देशात सध्या स्थितीला ३२८ जणांची कोरोनाशी यशस्वी झुंज देते कोरोनामुक्त झाले आहे. तसेच देशभरात आतापर्यंत कोरोनामुळे १३१ जणांचा मृत्यू झाला.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या

  • मुंबई – ४६९
  • पुणे (शहर व ग्रामीण) – ११९
  • सांगली – २५
  • ठाणे मंडळ – ८३
  • नागपूर – १७
  • अहमदनगर – २२
  • यवतमाळ – ४
  • लातूर – ८
  • बुलडाणा – ५
  • सातारा – ४
  • औरंगाबाद – ७
  • उस्मानाबाद – ४
  • कोल्हापूर – २
  • रत्नागिरी – २
  • जळगाव – २
  • सिंधुदुर्ग – १
  • गोंदिया – १
  • नाशिक – १
  • वाशीम – १
  • अमरावती – १
  • हिंगोली – १
  • इतर राज्य (गुजरात) – २
एकूण – ७८१
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जनतेची लूट, विकासकामात तूट, जाहिरातबाजी आणि उधळपट्टीला सूट! अशोक चव्हाण

News Desk

पश्चिम महाराष्ट्राच्या मदतीसाठी रामराजे नाईक-निंबाळकर सरसावले!

News Desk

महावितरणमधील तंत्रज्ञांच्या सात हजार पदांसाठी उमेदवारांची निवड येत्या आठवड्यात जाहीर होणार। नितीन राऊत

News Desk