HW News Marathi
देश / विदेश

…म्हणून बीएसएफ जवानाचा ७ दिवसाचा पगार कापला

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदरार्थी उल्लेख न करणे सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) एका जवानाला चांगलेच महागात पडले. त्या जवानाचा सात दिवसांचा पगार कापण्यात आला असून मोदींच्या नावापुढे श्री किंवा माननीय या आदरार्थी शब्दांचा वापर न केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पश्चिम बंगालमधील महतपूर येथे बीएसएफच्या १५ व्या बटालियनचे जवान ‘झिरो परेड’ करत होते. जवानांच्या दररोजच्या सरावातील तो एक भाग असतो. या परेडमध्ये कॉन्स्टेबल संजीव कुमारने रिपोर्ट करताना ‘मोदी प्रॉग्रेम’ असा उल्लेख केला. याची दखल घेत कमांडंट अनूपलाल भगत यांनी संजीव कुमारवर कारवाई केली आहे.

बीएसएफ अॅक्टमधील नियम ४० अंतर्गत त्यांनी ही कारवाई केली. संजीवकुमारचा सात दिवसांचा पगार कापण्यात आला आहे. बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या कारवाईवर आता नाराजी व्यक्त होत आहे. जवानाचा सात दिवसांचा पगार कापणे ही कारवाई अत्यंत कठोर स्वरुपाची वाटते, असे मत व्यक्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयात सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी सुनावणी पूर्ण, निर्णय ठेवला राखून 

News Desk

‘इस्रो’चे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त गुगलचे खास डुडल

News Desk

अखेर नोएडातील अनधिकृत ‘ट्विन टॉवर्स’ केले जमीनदोस्त

Aprna