HW News Marathi
महाराष्ट्र

‘मराठा क्रांती मोर्चा’चा राजकारणासाठी वापर करणाऱ्यांना धडा शिकवू !

मुंबई | नुकतेच ‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’चे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले असताना आता मराठा क्रांती मोर्चाने मात्र त्यास आपला विरोध दर्शविला आहे. “मराठा क्रांती मोर्चाच्या नावाखाली कोणीही निवडणुका लढवू नये”, असे मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, मराठा समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी मराठा समाजाचाच प्रतिनिधी सभागृहात हवा यासाठी आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे आबासाहेब पाटील यांनी मंगळवारी (२३ जुलै) स्पष्ट केले होते.

“मराठा क्रांती मोर्चाच्या नावाखाली कोणीही निवडणूक लढवू नये. आपल्या राजकारणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या नावाचा उपयोग करू नये. जर राजकारणासाठी मराठा क्रांती मोर्चाचा वापर केला गेला तर मराठा समाज त्यांना धडा शिकवेल”, असे मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या निवडणूक लढवणार असल्याच्या घोषणेनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन यास विरोध दर्शविला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने २७ जून रोजी मराठा आरक्षण वैधच असल्याचे म्हणत मराठा समाजाला नोकरीत १२ तर शिक्षणात १३ टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर मराठा समाजात अत्यंत आनंदाचे वातावरण होते. मात्र, मराठाच्या समाजाला आरक्षण मिळाले असले तरीही आमच्या अनेक मागण्या अद्याप राज्य सरकारने प्रलंबित ठेवल्याचा आरोप मराठा ठोक मोर्चाकडून करण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिवकुमारला २ दिवस पोलीस कोठडी

News Desk

नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर ४ जण जखमी

News Desk