HW News Marathi
मनोरंजन

Kargil Vijay Diwas : जाणून घ्या…कारगिल युद्धाचा संपूर्ण घटनाक्रम

मुंबई | कारगिल युद्धाला आज २० वर्षे पूर्ण झाली असून भारताने कारगिल युद्धात पाकिस्तानवर अभूतपूर्व विजय मिळवला होता. यामुळे भारतात २६ जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कारगिल युद्ध हे साहस आणि शौर्याचे प्रतिक मानले जाते. कारगिल युद्धात भारतीय जवानांनी प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असे शौर्य गाजविले आहे. जवळपास १८ हजार फूट उंचीवर कारगिलमध्ये झालेल्या या युद्धात देशाने ५२७ वीर गमावले होते तर १३०० पेक्षा जास्त जखमी झाले होते.

असा आहे कारगिल युद्धाचा घटनाक्रम

  • ३ मे १९९९ – एका व्यक्तीने भारतीय सेनेला कारगिलमध्ये पाकिस्तान सेनेने घुसखोरी करून ताबा मिळवल्याची माहिती दिली होती.
  • ५ मे १९९९ – भारतीय सेनेची पेट्रोलिंग टीम याची माहिती घेण्यासाठी कारगिल पोहोचली. त्यावेळी पाकिस्तानी सेनेने त्यांना ताब्यात घेतले आणि त्यातील ५ जणांची निर्घुण हत्या केली.
  • ९ मे १९९९ – पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय सेनेचे कारगिलमधील गोळाबारूद केंद्र नष्ट झाले.
  • १० मे १९९९ – पहिल्यांदा पाकिस्तानी घुसखोरांना लदाखचे प्रवेश व्दार म्हणजेच दास, काकसार आणि मुश्कोह सेक्टरमध्ये पाहिले गेले.
  • २६ मे – भारतीय सेनेने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
  • २७ मे – कार्यवाहीमध्ये भारतीय वायुसेनेने पाकिस्तान विरूद्ध मिग-२७ आणि मिग-२९ चा वापर केला. आणि फ्लाईट लेफ्टनंट नचिकेताला बंदी बनवले.
  • २८ मे – एक मिग-२७ हेलिकॉप्टर पाकिस्तानकडून पाडण्यात आले आणि यात चार भारतीय सैनिक शहीद झाले.
  • १ जून – एनएच-१ए वर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला.
  • ५ जून – पाकिस्तानी रेंजर्सकडून मिळालेल्या कागदपत्र भारतीय सेनेने मीडियासाठी जारी केले. ज्यात पाकिस्तामी रेंजर्सच्या असण्याचा उल्लेख आहे.
  • ६ जून – भारतीय सेनेने पूर्ण ताकदीनिशी पाकिस्तानला उत्तर देण्यास सुरुवात केली.
  • ९ जून – बाल्टिक क्षेत्राच्या २ मुख्य चौक्यांवरील पाकिस्तानी सैनिकांना ठार करत भारतीय सेनेने पुन्हा त्या चौकीवर ताबा मिळवला.
  • ११ जून – भारताने जनरल परवेझ मुशर्रफ आणि आर्मी चीफ लेफ्टनंट जनरल अजीज खान यांच्यातील झालेल्या संवादाचे रेकॉर्डींग जारी केले. यात उल्लेख आहे की, या घुसखोरीमध्ये पाक आर्मीचा हात आहे.
  • १३ जून – भारतीय सेनेने द्रास सेक्टरमधील चौकीवर ताबा मिळवला.
  • १५ जून – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी परवेझ मुशर्रफ यांना फोन करून सांगितले की, आपले सैन्य कारगिल सेक्टरमधून मागे बोलवा.
  • २९ जून – भारतीय सेनेने टायगर हिलजवळील दोन महत्वपूर्ण चौक्यांवर ५०६० आणि ५१०० वर ताबा मिळवला.
  • २ जुलै – भारतीय सेनेने कारगिलवर तीन बाजूंनी हल्ला चढवला.
  • ४ जुलै – भारतीय सेनेने टायगर हिलवर पुन्हा ताबा मिळवला.
  • ५ जुलै – भारतीय सेनेने द्रास सेक्टरवर पुन्हा ताबा मिळवला. त्यानंतर लगेच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी बिल क्लिंटन यांना सांगितले की, ते पाकिस्तानमधून त्यांची सेना माघारी बोलवत आहे.
  • ७ जुलै – भारतीये सेनेने बटालिकमध्ये असलेल्या जुबर हिलवर ताबा मिळवला.
  • ११ जुलै – पाकिस्तानी रेंजर्सनी बटालिकमधून पळण्यास सुरुवात केली.
  • १४ जुलै – पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ऑपरेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा केली.
  • २६ जुलै – पंतप्रधानांनी हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करण्याचा आदेश दिला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

FlashBack2018 : मुंबईकरांसाठी ‘या’ घटना ठरल्या धक्कादायक

News Desk

इंडियन आयडाॅलच्या स्पर्धकाला १ लाख ७० हजारांचा गंडा

News Desk

सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्व राज्यात ‘पद्मावत’ रिलीज

swarit