HW News Marathi
मनोरंजन

शाहरूखची बहीण पाकिस्तानमधून लढवणार निवडणूक

मुंबई | बॉलिवूडचा बादशहा म्हणजेच शाहरूख खान याची चुलत बहीण नूरजहॉं पाकिस्तानमधून निवडणूक लढवणार असल्याची माहीती समोर येत आहे. नूरजहाँ पाकिस्तानच्या PK-77 या मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला उभी राहणार आहे.

एका वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीत नूरजहाँ निवडणुकीला उभी राहणार आहे. तिला निवडणूक आयोगाकडून नामांकनाचे पत्रही मिळाले आहे. नूरजहाँ भारतात आत्तापर्यंत दोन वेळा शाहरूख खानकडे आली आहे. नूरजहाँचा भाऊ तिच्या सर्व प्रचारसभांची जबाबदारी घेणार असून नूरजहाँने एका पाकिस्तानी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार ती महिला सक्षमीकरणाकडे जास्त लक्ष देणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

News Desk

जाणून घ्या… मकरसंक्रांतीला पतंग उडविण्यामागचे वैज्ञानिक कारण

News Desk

#APJAbdulKalam : डॉ. अब्दुल कलामांचा असा होता कार्यकाळ…

News Desk