HW News Marathi
महाराष्ट्र

उद्या राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सामंत संवाद साधणार

मुंबई | राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संदर्भातील आढावा घेण्यासाठी उद्या सकाळी ११ वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू यांच्या सोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक होणार आहे.

या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उच्च तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, राज्यातील 13 विद्यापीठांचे कुलगुरू, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने सहभागी होणार आहेत. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत महाविद्यालय परीक्षा वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन, ऑनलाईन अध्यापन प्रणालीचा वापर यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार असून विद्यापीठ आणि महाविद्यालयीन परीक्षा वेळापत्रकासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तक देणार! – मुख्यमंत्री

Aprna

युजीसी फंडाची माहिती मागणाऱ्या विद्यार्थ्यास परीक्षा कक्षातून हकलले 

News Desk

खंबाळे-शिदवाडी शिवारातील पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

News Desk