HW News Marathi
महाराष्ट्र

युजीसी फंडाची माहिती मागणाऱ्या विद्यार्थ्यास परीक्षा कक्षातून हकलले 

भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकाविरुद्ध पोलिसांत तक्रार

उत्तम बाबळे । भोकर

दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर येथील एका विद्यार्थ्याने महाविद्यालयास येणाऱ्या युजीसी फंड व प्राचार्यांच्या तासिकेविषयी माहिती अधिकार अर्जाद्वारे माहिती मागितल्याच्या कारणास्तव प्राचार्यांनी त्या विद्यार्थ्यास अवमानित करुन परीक्षा कक्षातून हाकलून दिले. परीक्षेतील एका विषयाच्या पेपरपासून वंचित राहिलेल्या त्या विद्यार्थ्याने या विषयी पोलिसांत तक्रार दिली आहे.

दिगंबरराल बिंदू महाविद्यालय भोकर येथे वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी माधव मेकेवार याने काही महिन्यापूर्वी महाविद्यालय विकासास्तव युजीसी फंड किती आला व तो कशावर खर्च करण्यात आला? आणि मुख्यालयी न राहणा-या प्राचार्यांनी चालू शैक्षणीक वर्षात किती तासिका घेतल्या ? या विषयी माहिती अधिकार अर्जाद्वारे माहिती मागीतली होती. त्यास अद्यापही ती माहिती दिलेली नसून तो अपिलात गेला आहे. या कारणावरुन दि.२९ मार्च रोजी तो विद्यार्थी परिक्षा हॉलमध्ये उत्तर पत्रिका लिहीत असतना गार्डींगवर असलेल्या एका प्राध्यापकामार्फत प्राचार्यांनी त्यास बाहेर काढले व प्राचार्याच्या कक्षात बोलावून नेऊन अश्लिल शिवीगाळ, धक्काबुक्की केली व जीवे मारण्याची धमकी देऊन महाविद्यालयाबाहेर हाकलून दिले. यामुळे हा विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला असून त्याचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. अशा आशयाची तक्रार त्या विद्यार्थ्याने ३० मार्च रोजी भोकर पोलिसांत दिली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी व संबंधितांकडे केली आहे. सदरील महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष माजी राज्य मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर हे असून सध्याचे प्राचार्य हे त्यांच्या विशेष मर्जितील असल्यामुळे त्यांची अरेरावी वाढली असल्याचे अनेक विद्यार्थ्यांतून सांगितले जात आहे. दरम्यान, या तक्रारीबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्या आलेला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्पात पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे, पानचट,पचपचीत आणि प्रतिगामी अर्थसंकल्प! – आशिष शेलार

Aprna

असाल तेथेच थांबून राहा, आपल्या निवास व भोजनाची हमी आमची !

News Desk

“तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही”

News Desk