HW News Marathi
व्हिडीओ

Imtiyaz jaleel And Nitin Gadkari | नितीन गडकरी सर्वात चांगले मंत्री, इम्तियाज जलीलांकडून कौतुक ..

एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष कौतूक केले आहे. गडकरी यांनी मोटार वाहन दुरुस्ती कायदा संसदेत मांडला. या कायद्याची अंमलबजावणी झाल्यास देशातील रस्ते अपघाताता मृत्यू पावणाऱ्यांची वाढती संख्या रोखली जाऊ शकते. गडकरींचे रस्ता वाहतुक नियमनाचे काम अत्यंत उत्कृष्ट आहे. विरोधक असलो तरी गडकरींच्या काम करण्याची पद्धत आणि नियतीवर कोणीही शंका घेऊ शकत नाही.देशात सर्वात चांगलं काम करणारे मंत्री म्हणून आम्ही त्यांचा नेहमी सन्मान करतो, अशा शब्दात इम्तियाज जलील यांनी गडकरींचे संसदेच्या सभागृहात कौतूक केले.नितीन गडकरी यांनी चौकोनाच्या बाहेर विचार करत कामं केली आहे. ड्रंक आणि ड्राईव्हला आळा घालण्यासाठी गडकरींनी मोटार वाहन दुरुस्ती कायदा आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे.त्यांच्या कामाचं पहिल्यांदाच जलील यांनी संपुर्ण सभागृहात कौतूक केलं आहे. राज्यातील पहिला आठ पदरी रोड पुणे – मुंबई एक्सप्रेस वे होणार आहे. या कामाचं सर्वस्वी श्रेय गडकरी यांना जातं असं जलील म्हणाले.तसेच, मद्यपान करुन वाहन चालवत निष्पाप लोकांचा बळी घेणा-यांवर वचक कसा बसवणार असा प्रश्नही जलील यांनी सभागृहात उपस्थित केला. #ImtiyajJaleel #NitinGadkari #PrakashAambedkar #VBA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Budget 2019 | अर्थसंकल्प २०१९..“सबका भला होगा”, पण कसा ?

News Desk

“ह्यांची लेकरं मंत्री अन् शेतकऱ्यांच्या लेकरांची माती”; Sadabhau Khot यांची बोचरी टीका

News Desk

ते फक्त नौटंकी करतात, त्यांना तसंच उत्तर देऊ; वेदांतावरून Devendra Fadnavis यांची टीका

News Desk