नवी मुंबई | राज्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी १० फिलिपाईन्स नागरिकांवर गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. नवी मुंबई पोलिसांनी फिलिपाईन्स नागरिकांवर महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना २०२० मधील आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती एएनआय वृत्ताकडू माहिती मिळाली आहे.
Maharashtra Police: 10 Filipino nationals have been booked in Vashi area of Navi Mumbai under Sections 188, 269, 270 of IPC, Section 14 of Foreigners Act 1946 & Section 11 of Maharashtra COVID-19 Regulations. #CoronavirusLockdown
— ANI (@ANI) April 5, 2020
फिलिपाईन्सचे १० नागरिक हे नवी मुंबईतील वाशी सेक्टर ९ नुरुल इस्लाम ट्रस्टच्या प्लॉट क्रमांक ६१ नुर-ए-मस्जिद या राहत होते. हे सर्वजण १० मार्च ते १६ मार्चदरम्यान वाशीत राहिले होते. या १० पैकी ६ जण इतर ठिकाणी राहायला गेले तर ३ जण वाशीतील मशिदीतीच राहिले होते. या तिघांपैकी एका ६८ वर्षीय आणि ४२ वर्षीय फिलीपाईनच्या नागरिकास कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी ही माहिती स्थानिक प्रशासनापासून लपवून ठेवली. या दोघांमुळे वाशीत १३ जणांना आणि नेरूळमधील एका नागरिकांला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे उघड झाले होते.
या फिलिपाईन्स नागरिकांवर कोरोनाची माहिती लपविल्यासंदर्भात भारतीय दंडविधान कलनमानुसार १८८, २६९, २७० विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम स १४ , साथीचे रोग अधिनियम १८९७ कलम ३, ४ महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाय योजना २०० कलम ११ नुसार त्यांच्याव गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.