HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपने ‘शवासन’ करावं, राऊतांचा योग दिनी खोचक सल्ला!

मुंबई। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज (२१ जून) योग दिनानिमित्त माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी राऊतांनी भाजपवर सणसणीत टीका केली आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. म्हणून भाजपसाठी तुम्ही कोणतं आसन सुचवाल?, असा सवाल माध्यमांनी केल्यानंतर शवासन करावं असं लागलीच उत्तर राऊतांनी दिलं. त्यामुळे आता राऊतांच्या टीकेला भारतीय जनता पक्ष काय प्रतिक्रिया देणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून काल (२०जून) ला संपूर्ण दिवस राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती, आणि अशातच आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिवसेना नेते संजय राऊत म्हणालेत की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूर्णपणे प्रताप सरनाईक यांच्या पाठीशी उभे आहेत. तर भाजपकडून तपास यंत्रणांचा त्रास दिला जातोय हेच प्रताप सरनाईक यांच्या पत्राचे सार असून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नाहक त्रास दिला जातोय हे सरळ दिसते. भाजपशी जुळवून घेण्याचा त्यांनी दिलेला सल्ला त्यांचं या सगळ्या त्रासातून आलेलं वैयक्तिक मत आहे. मात्र, एक पक्ष म्हणून भूमिका घेण्याचा अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आहे.

माझं नाव संजय, आम्ही वाघाच्या काळजाचे….

आमचं शरीर आणि काळजी दोन्हीही वाघाच्या काळजाच आहे म्हणून शिवसेना पक्ष आणि स्वतः उद्धव ठाकरे सरनाईक यांच्या पाठीशी ठाम उभे आहे, असे देखील संजय राऊत म्हणालेत तर पुढे बोलताना ते अस म्हणतात की, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार आहोत. आज आम्ही राजकारणात नाहीये. एक जमाना लोटलाय. पांढरे झाले. परत काळे करत आहोत. काय कराल, तुरुंगात टाकाल. आमची तयारी आहे तुरुंगात जायला. आम्ही महाभारताची उदाहरणे देतो. त्या महाभारतातील योद्धे आम्हीच आहोत, असं सांगतानाच माझं नाव संजय आहे, असा इशारा राऊत यांनी दिला.

सत्तेचा फॅार्म्युला सुरू…..

आघाडी कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाविकास आघाडी आहे, आणि आदर्श समन्वयाचं उदाहरण देखील महाराष्ट्रात आता सत्तेचा फॉर्मुला सुरू आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोघींमध्ये समन्वय साधून उत्तम सरकार चालवत आहे असे देखील संजय राऊत म्हणाले.

आमच्यात गटबाजी नाही…

प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्ब मुळे शिवसेनेत दोन गट असल्याची चर्चा आहे त्यास संजय राऊत यांनी नकार दिलाय शिवसेनेत एकच ग्रुप आहे तो म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेनेत कोणतीही गटबाजी नाही कोणताही गट नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात २४ ते ४८ तासात जोरदार पावसाची शक्यता

News Desk

गोपीनाथ मुंडेंच्या संस्थेकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष

News Desk

आमच्या सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर विठ्ठल प्रसन्न म्हणूनच…!

News Desk