मुंबई | गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा मुंबईसह उपनगरात जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात मंगळवारी (२३ जुलै) रात्रीपासून जोरदार पाऊस पडला आहे. यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील १० मिनिटे उशीराने धावत आहे. तर मध्य रेल्वेतील कुर्ला ते सायनदरम्यानवरील वाहतूक धिम्या मार्गावर वळविण्यात आली आहे. सायन ते माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने दादर ते कुर्ल्यादरम्यानची वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज (२४ जुलै) आणि उद्या (२५ जुलै) मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे.
Mumbai: Railway tracks submerge at Sion railway station, following heavy rainfall in the city. #MumbaiRains pic.twitter.com/cl4E0dgWf7
— ANI (@ANI) July 24, 2019
त्याचबरोबर मुंबईतील किंग सर्कल भागात रस्त्यावर साचले पाणी असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहेत. किंग सर्कल येथे २ ट्रक, १ एसटी आणि १ बस पाण्यात अडकली. मुसळधार पावसाने हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले पाहायला मिळाले. तर सायनच्या गांधी मार्केट परिसरात गुडघाभर पाणी साचलेले आहे. हवामान खात्याने वर्तविल्याप्रमाणे मुंबईसह उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. तसेच मुंबईतील लालबाग, परेल, दादर, सायन, कुर्लासह मुलुंड, भांडुप, पवई, अंधेरी, गोरेगाव या उपनगरांमध्येही पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. रात्रभर अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला दिसला.
#MumbaiRains: Roads in Sion area water-logged, after heavy rainfall in the city. #Maharashtra pic.twitter.com/iM9lOsOIk4
— ANI (@ANI) July 24, 2019
मुंबईत २६ जुलैला जोरदार पाऊस
मुंबईत पुन्हा एकदा २६ जुलै पुनावृत्ती होण्याचा इशारा स्कायमेटने वर्तविला आहे. २६ आणि २७ जुलैला मुंबईत मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तसेच आज आणि उद्याही मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईप्रमाणे कोकणातही जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.