नवी दिल्ली | कोरोनाचे जाळे देशभरात घट्ट पकड करतंच आहे. या अनुशंगाने केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने कोरोनाची चाचणी आणि उपचार हे आयुष्मान भारत योजने अंतर्गत आणणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातल्या ५० कोटी लोकांची चाचणी किंवा उपचार हे मोफत होऊ शकणार आहेत. नॅशनल हेल्थ अथॉरिटी अर्थात NHA ने यासंदर्भातली माहिती दिली आहे. या संबंधीचे ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केले आहे.
More than 50 crore poor & vulnerable citizens shall henceforth be eligible for free #COVID_19 testing & treatment under #AyushmanBharat #PMJAY
Testing at private labs & treatment in designated hospitals now made free for Ayushman beneficiaries across India@AyushmanNHA @ibhushan pic.twitter.com/ikXQhhYJJy— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) April 4, 2020
देशभरात कोरोना रुग्णांची संख्या २००० च्या वर गेली आहे. तर आत्तापर्यंत ६५ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोनापासून देशाचा कसा बचाव करता येईल आणि लोकांना कसे याच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवता येईल याकडे लक्ष देत आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.