HW News Marathi
मुंबई

कोरोनाग्रस्तांच्या संख्येनुसार आरोग्य विभागाकडे पुरेशी संसाधने उपलब्ध

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (४ एप्रिल) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. या दरम्यान, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५३७ वर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाशी लढत असलेल्या आरोग्य विभागातील सर्व डॉक्टरांचे आणि त्यांना प्रतिसाद देणाऱ्या जनतेचेही त्यांनी आभार मानले. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ५३७ वर पोहोचला असून आज (४ एप्रिल) ४७ नव्या रुग्णांची भर पडल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेस टोपे यांनी ट्विटरनरुन दिली. मुंबई २८, ठाणे १५, अमरावती १, पुणे २ असा या रुग्णांच्या आकडेवारीचा क्रम आहे. आत्तापर्यंत ५० जण कोरोनाच्या या संकटापासून बरे होत घरी गेल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

आपण मोठ्या पद्धतीने संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या माध्यमातुन कोरोनाचा संसर्ग कसा होणार नाही याची खात्री घेत आहोत. तरीही आणखी खबरदारी बाळगण्यासाठी ट्रेसिंग करण्याची गरज आहे. आत्तापर्यंत ९ लाख जणांचे ट्रेसिंग करण्यात आले आहे. त्यासाठी २४५५ टीम तयार करण्यात आल्या आहेत ज्या त्या कंटेंमेंट झोनमध्ये काम करतात. मुंबईसाठी जवळजवळ २९० कंटेंमेंट झोन तयार करण्यात आले आहेत. तसेच, पुणे, नागपूर या भागातही हे झोन तयार करण्यात आले आहेत.

तसेच, आरोग्य विभागाकडे पुरेशी संसाधने आहेत का यावर प्रश्न उपस्थित राहात होता. त्यांच्या या प्रश्नाचे उत्तरही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. २५ हजार पीपीई किट्स आणि अडीच लाख एन-९५ मास्क उपलब्ध आहेत. तसेच, २५ लाखाच्या वर ट्रिपल लेयर मास्क उपलब्ध आहे. सरकारी रुग्णालयात व्हेंटीलेटरची संख्या दीड हजार आहे आणि महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून १ एप्रिलपासून १००० ५०० बीडीडचे रुग्णालय इम्पॅन्ल्ड केले आहेत. ज्यामुळे नवीन २ हजार व्हेंटीलेटर्स आपल्याला उपलब्द होणार आहेत. तसेच केंद्र सरकारने सगळी जबाबदारी घेतली असून राज्याला ज्या काही आरोग्य विभागाच्या बाबी लागतील त्या केंद्र सरकार घेऊन देणार आहेत त्यामुळे कोरोनाबाधितांसाठी पुरेशी संसाधने आरोग्य विभागाकडे उपलब्ध असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. तसेच व्यायाम, योगासने करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारच्या कारभारावर जनतेचा भरोसा राहीला नाही

News Desk

मुंबईत मुसळधार पाऊस…रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत

News Desk

एटीएसने कांदिवलीतून ८ बांगलादेशीना अटक

News Desk