उल्हासनगर- पाच दिवसांपूर्वीच उल्हासनगरमध्ये अदाखलपात्र गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा उल्हासनगरात मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना आज घडली. पो. कॉ. पवन केदार आणि पो. ना. काझी अशी हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसांची नावे आहे.
मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कार्यरीत असणारे पो. कॉ. पवन केदार व पो. ना. काझी हे कॅम्प नं. ३ येथील सम्राट अशोकनगर परिसरात सायंकाळी ६ च्या सुमारास पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी ३ ते ४ व्यक्ती त्याठिकाणी एकत्र बसलेले असताना पोलिसांनी त्यांना हटकले. त्यावेळी त्या व्यक्तींनी केदार व काझी यांना मारहाण करीत जखमी केले. हा प्रकार मध्यवर्ती पोलिसांना कळताच पोलीस पथकांनी त्याठिकाणी धाव घेतली. १ ते २ जणांना पोलिसांनी या घटनेप्रकरणी त्वरीत ताब्यात घेतले. मध्यवर्ती रूग्णालयात दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले. या घटनेमुळे पोलिसांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.