HW News Marathi
मुंबई

डीसीपींच्या आदेशानंतर खंडणी उकाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई | वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नावे प्रत्येक महिन्याला सुमारे दहा लाखांची खंडणी उकाळणाऱ्या खंडणीखोरांविरोधात कांदिवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज शिंदे आणि रजकिरण असे खंडणीखोरांचे नावे आहेत.

विशेष म्हणजे डीसीपीच्या नावे ही खंडणी वसूल केली जात असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. डान्स बार मालकांकडून या प्रकाराबाबत वरिष्ट पोलिस अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नव्हती. यानंतर सर्व प्रकरणाची माहिती डीसीपी विक्रम देशमाने यांना देण्यात आली. त्यानंतर डीसीपी यांनी वरिष्ठ अधिका-याला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर खंडणीखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघेही खंडणीखोर मुंबईतल्या अनेक हॉटल चालकाक़डून 10 हजार रूपये हप्ता वसूल करतात. 28 फेब्रुवारी रोजी रात्री या खंडणीखोरांने ओम पॉलेस हॉटेलच्या मॅनेजरला बाहेर बोलावुन हप्ता ऐवजी दोन लाख रूपये दे अन्यता तुझी तक्रार पोलिसांनकडे करतो अशी धमकी दिली. हॉटेल चालक त्याला विंनती केली मात्र तो ऐकायला तयार नव्हता. शेवटी बार चालक कांदिवली पोलिसांकडे तक्रार दिली मात्र वरिष्ट पोलिस अधिकारी गुन्हा दाखल करण्याऐवजी उडवाउडवीचे उत्तर देत होते.

मुंबईतील डान्सबारमध्ये मुलींचे नाच सुरू असल्याची क्लिप तयार करून ती डीसीपीला पाठवली जाते, त्यानंतर पोलिस निरीक्षक आपल्या पथकाद्वारे संबंधित डान्स बारवर छापा टाकून कारवाई करत असे. या कारवाईचा फायदा घेत खंडणीखोर बार चालकांकडून महिन्याकाठी दहा लाख रुपयांची खंडणी वसुली करत होते. दरम्यान, हा सर्व प्रकार पोलिसांना अंधारात ठेवून सुरू होता, याचा सुगावा लागता बार चालकांना पोलिसांकडे संबंधित खंडणीखोरांची तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकावर पादचारी पुलाच्या कामासाठी विशेष पॉवर ब्लॉक

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक रविवारच्या वेळापत्रकानुसार, मुंबईकरांचे हाल

News Desk

दिवसाढवळ्या त्याने पॅंटेची चैन खोलून दाखवली

News Desk
महाराष्ट्र

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याबाजुने सर्व सदस्य एकवटले…

News Desk
  • कोणतीही शहानिशा न करता वृत्त प्रसिध्द करणाऱ्या माध्यमांवरही कारवाई करा…सदस्यांची मागणी…

मुंबई विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर आणि विधीमंडळावर झालेल्या दलालीच्या आरोपावरुन विधीमंडळातील सदस्य धनंजय मुंडे यांच्याबाजुने एकवटल्याचे चित्र सभागृहामध्ये आज पाहायला मिळाले. सर्वच सदस्यांनी शहानिशा न करता वृत्त प्रसिध्द करणाऱ्या आणि सदस्यांवर आरोप करणाऱ्या वाहिनीवर कारवाईची मागणी लावून धरली.

सभागृहामध्ये, शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार शरद रणपिसे

शिवसेनेचे आमदार अनिल परब, आमदार निलम गोऱ्हे, शिक्षकभारतीचे आमदार कपिल पाटील, आ.जोगेंद्र कवाडे, सौ. विद्या चव्हाण,आमदार अमरसिंह पंडित या सदस्यांनी विधीमंडळावर आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपावर आपले विचार मांडताना आपली नाराजी व्यक्त केली. शिवाय वृत्तवाहिनीने केलेल्या बदनामीबाबतही तीव्र संताप व्यक्त केला.

पहिल्यांदा विधानपरिषदेमध्ये सत्ताधारी सदस्यांनी विरोधी पक्षनेत्यावर झालेल्या आरोपावर भाष्य केले. विशेष म्हणजे प्रत्येक सदस्याने विधीमंडळावर करण्यात आलेल्या आरोपावर गंभीरतेने चर्चा केली आणि विधीमंडळाच्या विश्वासार्हतेबाबत निर्माण करण्यात आलेल्या प्रश्नचिन्हावर आक्षेप घेतला.

Related posts

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा यशस्वी पाठपुरावा!

News Desk

‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही’, नारायण राणेंचा टोला!

News Desk

यावर्षी बारावीचे सगळेच विद्यार्थी होणार पास! अंतर्गत मूल्यमापनाविषयी लवकरच होणार निर्णय

News Desk