HW News Marathi
महाराष्ट्र

दिल्लीतील मरकज कार्यक्रमानंतर ‘शब-ए-बरात’, आंबेडकर जयंतीसारखे सामूहिक सोहळे टाळा !

मुंबई | कोरोनाचा संसर्ग देशात वेगाने फैलावत आहे. नुकतेच दिल्लीतील निजामद्दीन येथील तबलिगी जमातने मरजक या धार्मिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातून देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती समोर आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (२ एप्रिल ) फेसबुकद्वारे संवाद साधताना त्यांनी निजामद्दीनमधील तबलिगी समाजाबदल पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी शरद पवार म्हणाले की, तबलिगी जमात’ने निजामुद्दीनचा सोहळा टाळायला हवा होता. कारण या कार्यक्रमामुळे आज आपल्याहा त्यांची किंमत मजावी लागेत, असे ते म्हणाले. तसेच सध्याची परिस्थिती पाहाता ‘शब-ए-बरात’ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सारखे सामूहिक सोहळे टाळायाल हवे, अशी विनंत पवारांनी जनतेला केली आहे.

पवार म्हणाले की, आजची परिस्थिती लक्षात घेऊन काही पत्यही पाळीज पाजिजे. पाहून सर्वांना मला सुचवावे असे वाटते की, तबलिगी जमात’ने निजामुद्दीनचा सोहळा टाळायला हवा होता. कारण या कार्यक्रमामुळे आज आपल्याहा त्यांची किंमत मजावी लागेत. पुन्हा असे घडता कामा नये, याजी काळजी आपण घ्याला पाहिजे, याची खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. जनतेने सामूहिक कार्यक्रम टाळले पाहिजे, अशा सूचना पवारांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला दिल्या आहेत.

दरम्यान, येत्या ८ एप्रिलला ‘शब-ए-बरात’ हा सामूहिक सोहळात आहे. यात मोठ्याप्रमाणात मुस्लिम बांधवांना यात सहभागी होतात. या दिवशी मुस्लिम समाजातील बांधव एकत्र येऊन करिस्तानात जातात. हयात नसलेल्या पूर्वजांची आठवण काढण्याचा हा दिवस असतो. सर्व मुस्लिम बांधवांनी घरात बसून आपल्या पूर्वजांची आठवण काढावी, अशी विनंती पवारांनी मुस्लिम समाजाला केली आहे. दिल्लीत निजामुद्दीनला जे घडले त्यांची पुनावृत्ती होणार यांची खबरदारी घ्या, असे आवाहन पवारांनी केले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती लांबणीवर टाकण्याचा विचार करावा !

‘१४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्याकडे एक महिना आधीपासून मोठ्या उत्साहात साजरा करित असतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा साजरा करण्याचा प्रसंग आहे का?, याचा आपण सर्वांनी गांभीर्यांनी विचार करण्याची गरज आहे. आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळा त्यांचे आपण स्मरण करणारच आहोत. मात्र, त्या दिवशी होणाऱ्या सामूहिक सोहळ्याचे आयोजन लांबणीवर टाकता येईका, याचा विचार आणि निर्मय जाणकारांनी करावा, असा शरद पवारांनी सूचविले आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप सरकारला चले जाव सांगण्याची हीच योग्य वेळः खा. अशोक चव्हाण

News Desk

पुण्यामध्ये आर्थिक व्यवस्थेला दिशा देणारे संशोधन केंद्र उभारण्यात येणार! – चंद्रकांत पाटील

Aprna

लक्षवेधी आंदोलन करण्याची मराठवाड्याची परंपरा

News Desk