HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये !

मुंबई | “शिवसेना-भाजपमध्ये युतीमध्ये जागावाटपाबद्दल आता कोणताही तिढा शिल्लक राहिला नाही. आम्ही दोघे जुळे भाऊ आहोत. आमच्यात कोणताही वाद नाही. तसेच दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांनी जागावाटपाबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये”, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. संजय राऊत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ही भूमिका स्पष्ट केली आहे.

भाजपचे नवनिर्वाचित खासदार चंद्रकांत पाटील यांनी भाजप-शिवसेनेचा जागावाटपाच्या फॉर्म्युलाबाबत अनेकदा विधाने केली आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये अद्याप धुसफूस सुरु असल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे, भाजप-शिवसेनेपैकी कोणीही मोठा किंवा लहान भाऊ नसून आम्ही दोघेही जुळे भाऊ आहोत असेही सूचक विधान संजय राऊत यांनी यावेळी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी आरक्षणाच्या लढ्यात तुमच्यासोबत, कोल्हेंचे धनगर समाजाला आश्वासन

News Desk

शिवसेना नेत्यांकडून जीवाला धोका, मुंबईतील खटले हिमाचलला हलवा, कंगना राणावतची मागणी

News Desk

ममता बॅनर्जी यांना आमच्या पक्षाचा पाठिंबा,ममताजींचे पत्र शरद पवार प्राप्त – नवाब मलिक

News Desk