मुंबई | महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. राज्यात आज (२ एप्रिल) पुणे २ आणि बुलढाणा १ अशा तीन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३३८ वर पोहोचली आहे. आता पुण्यात ४० तर बुलडाण्यात ५ कोरोना पॉझिटिव्हची संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान, मुंबईमध्ये १८१ कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या आहेत.
3 more #COVID19 cases reported in Maharashtra (2 from Pune & 1 from Buldhana) taking the total number of positive cases in the state to 338: Maharashtra Health Department
— ANI (@ANI) April 2, 2020
बुलडाण्यात २८ मार्च रोजी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती. मात्र, या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दोन जण देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती ३१ मार्चला मिळाली. यानंतर २३ वर्षीय तरुणाला काल (१ एप्रिल) कोरोनाची लागण झाल्याचे कळाले होते. त्यामुळे आता बुलडाण्यात आज (२ एप्रिल) कोरोना रुग्णांची संख्या ५ वर येऊ पोहोचली आहे. २३ वर्षीय तरुणाला जिल्ह्याला रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती मिळली आहे. बुलडाणामधील अजून तीन जणांचे रिपोर्ट येणे बाकी असून त्यांचे रिपोर्ट आज सायंकाळी येणार असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या
- मुंबई – १८१
- पुणे – ५२
- सांगली – २५
- ठाणे व इतर मनपा – ३६
- नागपूर – १६
- अहमदनगर – ८
- यवतमाळ – ४
- बुलडाणा – ५
- सातारा – २
- कोल्हापूर – २
- गोंदिया – १
- औरंगाबाद – १
- सिंधुदुर्ग – १
- रत्नागिरी – १
- जळगाव- १
- नाशिक – १
- इतर राज्य (गुजरात) – १
एकूण – ३३८
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.