HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच !

मुंबई | “काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक जण आमच्या संपर्कात असून त्यातील काही जण याच आठवड्यात राजीनामा देतील”, असा दावा भाजप नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काहीच दिवसांपूर्वी केला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. “चंद्रकांत पाटील यांना काही ना काही बोलायची सवय आहे. तो त्यांचा स्वभाव आहे आणि स्वभावाला काहीही औषध नसते”, असे अजित पवार म्हणाले. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

“चंद्रकांत पाटील यांना बोलत राहण्याची सवयच आहे. प्रत्येकवेळी ते काही ना काही बोलत राहतात. त्यामुळे लोकांच्या मनात देखील प्रश्न निर्माण होतो की त्यात आपला देखील लोकप्रतिनिधी आहे कि का ? पण तो चंद्रकांत पाटील यांचा स्वभावच आहे. स्वभावाला औषध नाही”, असे अजित पवार म्हणाले. “ज्यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता आहे, तेच रात्री-अपरात्री भाजपमध्ये येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत असतात”, या चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर देखील अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. “वर्षा बंगल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे लोक स्पष्ट दिसू शकतात. अशा पद्धतीने जाणूनबुजून लोकांच्या मनात लोकप्रतिनिधींविषयी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असे अजित पवार म्हणाले.

.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारामतीत १ कोरोना पॉझिटिव्ह, महाराष्ट्रात संख्या २०४ वर पोहोचली

swarit

“बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची दक्षता घ्या.” – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

Chetan Kirdat

“डॉ.आंबेडकर समाज भूषण पूरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार”- धनंजय मुंडे

News Desk