HW News Marathi
मुंबई

कर्जतमध्ये नीरव मोदीची तब्बल २५५ एकर जमीन

कर्जत | नीरव मोदीच्या नावाने कर्जत तालुक्यातील खंडाळा व कापरेवाडी या गावाच्या हद्दीत तब्बल २२५ एकर जमीन असल्याचे उघडकीस आले आहे. या जनिनीच्या सातबाऱ्यावर नीरव मोदींचे नाव असून बाकीच्या जमीनीवर फायर स्टोन कंपनीचे नावे आहे. नीरवने मुंबईतील गोयल नावाच्या व्यक्तीकडून प्रत्येकी ५० हजार रुपये एकराप्रमाणे जमीन विकत घेतली होती.

खरेदी केलेल्या जमीनीवर सोलर प्लँट बनवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. सीबीआयने हा सोलर प्लँट सुद्धा सील केला आहे. खंडाळा येथे त्यांच्या नावाने २५ एकर जमिनी आहे. खंडाळा आणि कापरेवाडी या परिसरात त्यांच्या मालकीची जवळपास २२५ एकर जमीन अशी माहिती चौकशीतून पुढे आली आहे.

तसेच कर्जत शहरापासून ५ किलोमीटर आंतरावर खंडाळा, गोयकरवाडा, वाघनळी या तीन गावात तब्बल ५०० एकरची डोंगरा परिसर आहे. तर त्यातील बहुतांश जमीन खंडाळ्यात येतो. इतर भागात दगड-धोंडे असल्याने येथे काही पीकत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चहा पिताना धक्का लागल्यामुळे पुण्यात तरुणाचा खून

News Desk

यंदाचा मुंबई श्री किताब परेळच्या अनिल बीलावाने पटकावला

News Desk

वाहनांच्या मार्गक्रमणाच्या खात्रीसह पारदर्शकता जपणेही होणार सुलभ

Gauri Tilekar
राजकारण

नेवाळी आंदोलनातील शेतकऱ्यांचे गुन्हे मागे घेणार | मुख्यमंत्री

News Desk

नागपूर | भारत स्वातंत्र्यपूर्व काळात केंद्र शासनाने संपादित केलेल्या जमिनी परत मिळाव्यात याकरिता गेली ७५ वर्षे अंबरनाथ व कल्याण तालुक्यातील नेवाळी,भाल,खोणी,चिंचवली या परिसरातील १७ गावातील शेतकऱ्यांच्या १६७० एकर जमिनी परत मिळाव्यात यासाठी नेवाळी परिसरातील गावकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. केंद्र शासनाने सदर जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याऐवजी कल्याण मध्ये प्रस्तावित असलेल्या विमानतळासाठी जमिनी संपादित केल्याने नेवाळी गावातील ग्रामस्थ व शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे. सदर जमिनीवर शेतकरी गेली अनेक वर्षे शेती तसेच भाजीपाला (भात, वांगे, भेंडी, गवार इ.) यासारखी पिके घेऊन उदरनिर्वाह करीत आहेत.

परंतु नौदलाने जमिनी भोवती संरक्षक भिंत बांधून शेतकऱ्यांच्या पारंपारिक भातशेती करण्यास विरोध केल्याने शेतकऱ्यांचा उद्रेक झाला होता २२ जून २०१७ रोजी नेवाळी जमीन बचाव आंदोलन समितीच्या वतीन उग्र आंदोलन करण्यात आले.आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार व लाठीमार केल्याने अनेक भूमिपुत्र आंदोलक गंभीर रित्या जखमी झाले होते.स्थानिक आंदोलक शेतकऱ्यांवर मानपाडा तसेच हिल लाईन,उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशन,बदलापूर पोलीस स्थानकांत विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले.त्यामुळे नेवाळी,भाल,खोणी,चिंचवली व परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या गुन्ह्यांमध्ये विद्यार्थी व तरुणांनाचा समावेश असल्याने विद्यार्थ्यांना रोजगारासाठी व शिक्षणासाठी अडचणी निर्माण होत असल्याने आज पालकमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन समितीचे नेते तथा सरपंच चैनू जाधव ,विलास पाटील, नाना डोंगरे,अशोक म्हात्रे, रुपेश म्हात्रे यांनी आज नागपुरात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.नेवाळी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाले असून शेतजमिनी परत मिळवण्यासाठी वर्षभरापूर्वी झालेल्या नेवाळी आंदोलनातील शेतकरी व आंदोलकर्त्यां शेतकऱ्यांन विरोधातील गंभीर गुन्हे सरकारने मागे घेतलेले नाहीत. ते गुन्हा मागे घ्यावेत,तसेच शासनाने नेवाळी परिसरातील भूसंपादित शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा,अशी मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली या वेळी सर्वपक्षीय आमदारांनी सुद्धा नेवाळी मधील शेतकऱ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या अश्या पद्धतीचे निवेदन मुख्यमंत्र्यांसमोर सादर केले.

यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई ,खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आ. रुपेश म्हात्रे, आ. सुभाष भोईर, आ. डॉ. बालाजी किणीकर, आ. मंदाताई म्हात्रे, आ.किसन कथोरे, आ. प्रताप सरनाईक, आ.प्रताप सरनाईक, आ. प्रशांत ठाकूर आ. शांताराम मोरे, आ. रवींद्र फाटक, आ. गणपत गायकवाड, आ. नरेंद्र पवार या आमदारांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा योग्य प्रतिसाद देत नेवाळी मधील गुन्हे लवकरच मागे घेतले जाणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Related posts

गौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk

राहुल गांधींनी फोनवरून संजय राऊतांच्या तब्येतीची केली विचारपूस

Aprna

…तर देशातील जनतेचा भाजपावर विश्वास राहणार नाही। रामदेव बाबा

News Desk