HW News Marathi
मुंबई

‘आर्थिक निकषावर आरक्षणाचा डावा उधळून लावू’ | रामदास आठवले

मुंबई | ‘या देशात जाती आहेत, तोपर्यंत जातीवर आधारित आरक्षण राहणार, दलित, आदिवासी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्क लावू देणार नाही. देशातील सर्व जाती व्यवस्था आधी नष्ट करा, मग आरक्षणावर बोला’ अशी भूमिका रिब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली.

‘शो मराठी मनाचा’ नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. ‘आरक्षण हे आर्थिक निकषावर असावे, मग तो कोणत्याही जातीचा असो’ अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. तसेच दलित, आदिवासी आणि ओबीसी यांच्या आरक्षणाला धक्का न लागता, मराठा, लिंगायत आणि ब्राम्हण या सर्वांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे.

आरक्षणाची मर्यादा ५० टक्के वाढवून ७५ टक्के करण्यात यावी. तसेच झाल्यास सर्वांना आरक्षणचा लाभ मिळेल. त्यामुळे आरक्षणावरुन होणारी भांडणे संपतील असा दावा रामदास आठवले यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जय फाउंडेशनच्या स्वच्छता मोहीमेचे 75 आठवडे, इको फ्रेंडली गणेशोत्सवाचा दिला संदेश

News Desk

मुंबई महापालिका कर्मचा-यांची दिवाळी गोड, बोनस जाहीर

News Desk

ठाण्यातील अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला मंजुरी 

News Desk