नवी दिल्ली | देशाच्या इंचनइंच जमिनीवरुन घुसखोरांना आणि अवैध प्रवाशांना बाहेर काढू, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राज्यसभेत प्रश्नोत्तर तासादरम्यान म्हटले. त्या लोकांची ओळख पटवून त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार देशाबाहेर काढून देण्यात येईल, असा इशारा देखील शहांनी दिला. आसाममध्ये लागू असलेली नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) आसाम करारचा हिस्सा असल्याचे शहा सभागृहात म्हणाले.
Union Home Minister Amit Shah in Rajya Sabha: We will identify all the illegal immigrants and infiltrators living on every inch of this country and deport them as per the international law. pic.twitter.com/IqSYQMcqK1
— ANI (@ANI) July 17, 2019
सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद भाषण ऐकले असेल. आम्ही ज्या संकल्पपत्राच्या आधारे निवडून आलो आहोत, त्यामध्ये याचा समावेश आहे, असे शहांनी म्हटले. देशाच्या इंचनइंच जमिनीवर जितके अवैध प्रवासी, घुसखोर राहतात, त्यांची ओळख पटवली जाईल. यानंतर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे त्यांना देशाबाहेर काढले जाईल, असे शहा म्हणाले.
राष्ट्रपती आणि सरकारकडे २५ लाखांपेक्षा अधिक असे अर्ज मिळाले आहेत ज्यामध्ये म्हटले आहे की, काही भारतीयांना भारताचे नागरिक मानले गेले नाही. मात्र एनआरसीमध्ये काही अशा नागरिकांना भारतीय मानण्यात आले आहे, जे बाहेरून आले आहेत. तसेच अशा प्रकरणात सरकारने सर्वोच्च न्यायालयात विनंती केली आहे, अशा अर्जांवर विचार करण्यासाठी सरकारला थोडा वेळ दिला जावा.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.