HW News Marathi
Uncategorized

५ हजार गरीबांना अन्न धान्य वितरित करुन घडवला आदर्श…

नागपूर | मानव सेवा हाच श्रेष्ठ धर्म आहे हे जाणून राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी नागपुर शहरातील जवळपास ५ हजार गरीब उपाशी जनतेला अन्नधान्य वितरित करून एक आदर्श घडविला आहे. हातावर पोट असणाऱ्या व रस्त्यावर झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या जेवणाची सोय कशी होणार या काळजीने हैराण झालेल्या आमदार प्रकाश गजभिये यांनी नागपूर येथील गरीब लोकांना दिलासा दिला शिवाय घाबरण्याचे कारण नाही आम्ही गरीबांच्या पाठीशी आहोत असा विश्वासही सर्वांना दिला.

कोरोना व्हायरसमुळे गरीबांवर अशी वेळ आली असून याकरिता आमदार प्रकाश गजभिये यांनी शनिवारी नागपूरचे जिल्हाधिकारी ठाकरे यांची एका शिष्टमंडळासमवेत भेट घेत गरिबांच्या समस्येविषयी चर्चा केली. सर्व गरीबांना मोफत अन्नधान्य द्या त्यांना औषधे,भाजीपाला,किराणा व जगण्यासाठी जीवनावश्यक वस्तु उपलब्ध करून द्या. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांना एका दिवसात रेशनकार्ड तयार करुन द्या. मोफत सॅनिटायझर, साबण, डेटॉल उपलब्ध करून देण्याची मागणीही आमदार प्रकाश गजभिये यांनी केली.

यावेळी गरीबांना सर्व सुविधा व मदत विनामूल्य देण्याबाबत सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान १ एप्रिलपासून सर्वांना मोफत रेशन दुकानात अन्नधान्य देण्यात येईल असेही स्पष्ट केले.एक संकल्पवान व्यक्तीसाठी जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. परंतु एका छोट्याशा व्हायरसमुळे सर्व जगच हतबल झालंय. या संकटात शेवटी माणसातच खरा देव दिसायला लागला आहे अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश गजभिये यांनी व्यक्त केली आहे. यावेळी आमदार प्रकाश गजभिये यांच्यासोबत शिष्टमंडळात डॉ. खान,आसिफभाई ,अफजल भाई ,प्यारूभाई ,भूपेंद्र सनेश्वर ,मनोज नागपुरकर,अनिल नागपुरकर व अहफाजभाई उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन्ननलिकेतून काढले देवाचे लॉकेट

News Desk

बारामतीत आणखी १ कोरोना पॉझिटिव्ह, सर्वत्र चिंतेंचे वातावरण

News Desk

राज्य सरकार अडीच वर्ष चालणार, संजय शिरसाट नाराज नाही- मंत्री रावसाहेब दानवे

News Desk